निधन वार्ता
कातवीतील दुग्ध व्यवसायिक ज्ञानेश्वर पिंपळे यांचे वृद्धापकाळाने निधन
वडगाव मावळ : कातवी परिसरातील ज्येष्ठ दुग्ध व्यवसायिक म्हणून ओळख असलेले ज्ञानेश्वर बाबुराव पिंपळे (वय ९५) यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने कातवीसह वडगाव मावळ परिसरात शोककळा पसरली आहे.
ज्ञानेश्वर पिंपळे हे शांत, मनमिळावू आणि मेहनती स्वभावाचे म्हणून गावात विशेष आदराने पाहिले जात. दीर्घ काळ दुग्ध व्यवसायात कार्यरत राहून त्यांनी गावातील अनेक कुटुंबांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यास हातभार लावला होता. स्थानिक समाजकारण व विकासकामातही त्यांचा सहभाग उल्लेखनीय राहिला आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार मुली, दोन भाऊ, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मावळ तालुक्यातील भाजपा संघटक संतोष पिंपळे तसेच उद्योजक मंगेश पिंपळे यांचे ते वडील होते. तर ह.भ.प. मारुती पिंपळे आणि दशरथ पिंपळे यांचे ते बांधू होत.
पिंपळे यांच्या निधनाने कातवी गावाने एक कर्तृत्ववान आणि गावासाठी आयुष्यभर झटणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार गावातील स्मशानभूमीत रविवार दुपारी पार पडले. गावातील मान्यवर, नातेवाईक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















