Homeमहत्त्वाचेकुसगाव खुर्द परिसरात तीन शेळ्या गायब; बिबट्याच्या हालचालींची भीती वाढली

कुसगाव खुर्द परिसरात तीन शेळ्या गायब; बिबट्याच्या हालचालींची भीती वाढली

कुसगाव खुर्द परिसरात तीन शेळ्या गायब; बिबट्याच्या हालचालींची भीती वाढली

कामशेत : कुसगाव खुर्द परिसरात शुक्रवारी संध्याकाळी घडलेल्या घटनेने स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संध्याकाळी पाचच्या दरम्यान विनायक दत्तू लालगुडेंनी आपल्या शेळ्यांचा कळप चराईसाठी डोंगर पायथ्याशी नेला होता. नियमितप्रमाणे तेथून परतताना मात्र तीन शेळ्या परत न आल्याचे त्यांच्या लक्षात आले. उर्वरित दहा शेळ्या मात्र सुरक्षित घरी आणण्यात आल्या.

गावकऱ्यांनी या परिसरात काही विचित्र आवाज ऐकला असल्याचे सांगत आहे, बिबट्या किंवा इतर एखाद्या वन्यप्राण्याने हल्ला केला असावा, असा अंदाज वर्तवला आहे. चरनारी जनावरे अचानक पळू लागल्याचे काहींनी पाहिले. त्यामुळे वन्यप्राण्याची उपस्थिती असल्याचा संशय अधिक बळावला आहे.

याबाबत माहिती मिळताच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गणेश लालगुडे आणि अन्य स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वनविभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवली. वनअधिकाऱ्यांचे पथकं लगेच घटनास्थळी पोहोचली आणि परिसराची पाहणी केली. मात्र घनदाट झाडी, तसेच अंधार पडण्याच्या वेळेमुळे शोधमोहीम राबवणे अवघड झाले असल्याचे प्राथमिक माहितीवरून सांगण्यात आले.

वनविभागाचे अधिकारी प्रकाश शिंदे यांनी सांगितले की, परिसरात बिबट्याच्या हालचालींबाबत आधीपासूनच अधून-मधून माहिती मिळत असते. त्यामुळे शेतकरी व पशुपालकांनी सावधगिरी पाळणे अत्यंत गरजेचे आहे. रात्रीच्या किंवा संध्याकाळी उशिराच्या वेळी जनावरे चरायला नेऊ नयेत, तसेच गटाने चराई करावी, लहान मुलांवर लक्ष ठेवावे. एकट्याने फिरणे टाळावे. गरज असल्यास मोबाईलचा आवाज करत बाहेर पडावे. गाय म्हैस शेळी व अन्य पाळीव जनावरे बंदिस्त गोठ्यात बांधावी असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना वनविभागाचे आवाहन

वनविभागाने पुन्हा एकदा स्पष्ट केले की, कुसगाव–कामशेत परिसरात शेळ्या-जनावरे चराईसाठी नेताना विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. कोणतीही अस्वाभाविक हालचाल, पावलांचे ठसे, शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज किंवा वन्यप्राण्याची चाहूल लागल्यास तातडीने वनविभागाशी संपर्क साधावा.
गायब झालेल्या शेळ्या मिळाल्यास पुढील शासकीय प्रक्रिया करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!