*नविन नेतृत्वाची नांदी; नर्सिंग विद्यार्थ्यांचा गुणगौरव व युवा नेतृत्व प्रशिक्षण सोहळा उत्साहात*

तळेगाव दाभाडे :

समाजघटक म्हणून जबाबदार नागरिक घडविण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्या वतीने आयोजित नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ तसेच Youth Leadership Training (नेतृत्व विकास प्रशिक्षण) कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. शिस्तबद्ध नियोजन, प्रेरणादायी मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.

कार्यक्रमात प्रमुख प्रशिक्षक म्हणून रो. डॉ. धनश्री काळे यांनी विद्यार्थ्यांना नेतृत्व विकासाचे मोलाचे धडे दिले. अभ्यासक्रमातील सोप्या व उपयुक्त टिप्स देत शिक्षण घेत असतानाच समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग कसा घेता येईल, याचे त्यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. स्वयंसेवा, संघभावना, वेळेचे नियोजन आणि सामाजिक भान या विषयांवर त्यांनी केलेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष रो. संतोष परदेशी होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषद शाळांमध्ये घेण्यात आलेल्या हिमोग्लोबिन तपासणी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या अमूल्य सहकार्याबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. सामाजिक आरोग्य उपक्रमांमध्ये नर्सिंग विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रोजेक्ट चेअरमन रो. दिपाली शिंदे यांनी केले. त्यांनी रोटरीच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती देत युवा पिढीने नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रभावी व ओघवते सूत्रसंचालन रो. प्रशांत ताये यांनी केले, तर आभार प्रदर्शन रो. प्रदीप टेकवडे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रो. प्रदीप मुंगसे व रो. राकेश गरुड यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी रो. दिनेश चिखले, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य तसेच अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ऑफिसर यांची उपस्थिती लाभली.

मार्गदर्शन, गुणगौरव आणि नियोजनबद्ध आयोजनामुळे हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सामाजिक जाणीव आणि नेतृत्वगुण विकसित होतात, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

प्रतिनिधी.गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती; नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन वडगाव मावळ दि. २७ : आगामी...

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू कान्हे फाटा येथे कंटेनरची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ वडगाव मावळ दि. २७ : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात...

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल वडगाव मावळ, दि. 24 : जनगणना 2027 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शासकीय प्रगणकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतरही...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी वडगाव मावळ, दि. १९ : येथील रयत शिक्षण संस्था संचालित...

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

error: Content is protected !!