Homeशिक्षण-प्रशिक्षणवडगाव मावळ येथे पाच अंगणवाड्यांचे नूतनीकरण; बालविकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

वडगाव मावळ येथे पाच अंगणवाड्यांचे नूतनीकरण; बालविकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

वडगाव मावळ येथे पाच अंगणवाड्यांचे नूतनीकरण; बालविकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

वडगाव मावळ (ता. मावळ) येथे ऍटलास कॉपको कंपनी व होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पंचमुखी, ठाकरवाडी, बाजारपेठ, मधुबन व कातवी येथील पाच अंगणवाड्यांचे नूतनीकरणाचे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले. या नूतनीकरण केलेल्या अंगणवाड्यांचा उद्घाटन सोहळा मंगळवार, दि. 13 जानेवारी 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या उद्घाटन कार्यक्रमास होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. कॅरोलिन मॅडम, संस्थेचे सीईओ शकील शेख, एज्युकेशन मॅनेजर वैशाली पवार मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच ऍटलास कॉपको कंपनीकडून विभूती पांड्या (HR मॅनेजर), भूषण काटकर (शेक मॅनेजर), योगेश वडुंकर (इंजिनिअरिंग हेड) आणि सुरेंद्र सिंग (सेल्स अँड सर्व्हिस हेड) यांच्यासह कंपनीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ACEF व AVEF संस्थांचे प्रतिनिधी गणेश गवारे (जनरल सेक्रेटरी, ACEF) व गणेश शिवले (व्हाइस प्रेसिडेंट, AVEF) यांनीही उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले. उद्घाटन समारंभास बालविकास प्रकल्प अधिकारी (CDPO) संध्या नगरकर मॅडम तसेच संबंधित विभागाच्या सुपरवायझर संगीता ठाकूर मॅडम यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

या नूतनीकरण प्रकल्पाअंतर्गत अंगणवाड्यांमध्ये स्वच्छता व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, शौचालय व्यवस्था, रंगकाम तसेच सुरक्षित व आनंददायी शिक्षण वातावरण निर्माण करण्यात आले आहे. या सुविधांमुळे अंगणवाड्यांमध्ये येणाऱ्या बालकांच्या आरोग्य, स्वच्छता व शिक्षणाच्या दर्जात लक्षणीय सुधारणा होण्यास मदत होणार आहे.

या संपूर्ण प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान अश्विनी हेंद्रे यांनी समन्वयक (Coordinator) म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. स्थानिक पातळीवर कामाचे नियोजन, प्रभावी अंमलबजावणी व विविध यंत्रणांमधील समन्वयामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकला.

कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) अंतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील बालविकासाला चालना मिळाली असून, सामाजिक संस्था व उद्योगविश्वाच्या सहकार्याने समाजहितासाठी उचललेले हे प्रेरणादायी पाऊल भविष्यात अनेक पिढ्यांसाठी लाभदायी ठरणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!