Homeसामाजिकमिळालेल्या मताधिक्याच्या इतकी एक लाख दहा हजार झाडे लावणार - आमदार शेळके

मिळालेल्या मताधिक्याच्या इतकी एक लाख दहा हजार झाडे लावणार – आमदार शेळके

मिळालेल्या मताधिक्याच्या इतकी एक लाख दहा हजार झाडे लावणार – आमदार शेळके

आमदार सुनील शेळकेंचा पर्यावरण रक्षणासाठी संकल्प

देहूगाव, (प्रतिनिधी) १८ एप्रिल  “मी एक लाख दहा हजार मतांनी निवडून आलो… आता त्याच प्रमाणात म्हणजे एक लाख दहा हजार झाडे लावणार!”, असा ठाम आणि प्रेरणादायी संकल्प मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केला. वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी उपस्थित नागरिकांना ‘झाडे लावा आणि झाडे जगवा’, हा संदेश दिला.

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र देहू येथे वृक्षदाई प्रतिष्ठान, महात्मा फुले प्रतिष्ठान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीक्षेत्र देहू येथील जगद्गुरू अभंग गाथावन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात आमदार सुनील शेळके यांनी त्यांच्या कार्यकाळात एक लाख दहा हजार झाडे लावणार असल्याची घोषणा केली. कार्यक्रमाला श्रीक्षेत्र देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप जालिंदर महाराज मोरे, देहूगावच्या नगराध्यक्ष पूजा दिवटे, देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्यासह विविध संस्था, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काँक्रिटच्या जंगलातून हिरवाईकडे वाटचाल

‘आपण डोंगर फोडतो, काँक्रिटचे रस्ते, पूल उभे करतो. आजूबाजूला फक्त सिमेंटचं जंगल दिसतं. पण झाडं लावणं आणि त्यांचं संगोपन करणं ही आता काळाची गरज आहे,’ असे सांगत आमदार शेळके यांनी उपस्थित नागरिकांना जागरूकतेचं आवाहन केलं. देहूतील ‘गाथा वन’ या आठ एकर वनक्षेत्राचा विशेष उल्लेख करत ते म्हणाले, “हे वनक्षेत्र चांगलं विकसित करा. नगरपालिकेने दोन कर्मचारी द्यावे, पाण्याची सोय करावी. मी जागेला कुंपण घालून देईन.”

वृक्षसंवर्धनातूनच भविष्य सुरक्षित

“पाच-दहा वर्षांनंतर याच झाडांच्या छायेसाठी, ऑक्सिजनसाठी लोक इकडे धाव घेणार आहेत. झाडाखाली बसलं की शांतता, पक्ष्यांचा किलबिलाट, पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते. हा आनंद पैशांनी विकत घेता येत नाही,” असा भावनिक सूर आमदार शेळकेंनी व्यक्त केला.

मी झाड लावतो, तुम्ही झाड जगवा”

“आपला आमदारकीचा पाच वर्षांचा कार्यकाळ आहे. मी झाडे लावीन, पण ती जगवण्याची जबाबदारी तुमची आहे”, असे आमदार शेळके यांनी सांगितले. तुम्ही जितकी झाडे जगवाल तितकी माझ्या मतांत वाढ होईल,” असा मिश्किल शेराही त्यांनी मारला.

“वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे” ही संकल्पना प्रत्यक्षात आणत आमदार शेळके यांनी पर्यावरण संवर्धनासाठी दिलेला शब्द आता कृतीतून पूर्ण करण्यासाठी नागरिक कसा प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!