वडगांव मावळ : भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आणि मावळ तालुक्यातील मंडल अध्यक्षांचा भव्य सत्कार समारंभ शुक्रवार दिनांक १६ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता वडगाव मावळ येथील श्रीकृष्ण हॉटेल येथे आयोजित करण्यात आला असून नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष पुणे उत्तर(मावळ) प्रदीप कंद, यांसह पवन मावळ मंडल अध्यक्ष दत्तात्रय माळी, वडगाव अंदर मावळ मंडल अध्यक्ष अभिमन्यू प्रकाश शिंदे, तळेगाव दाभाडे इंदोरी गण अध्यक्ष चिराग सुरेशराव खांडगे, श्री क्षेत्र देहू देहूरोड मंडल अध्यक्ष रघुवीर उद्धवराव शेलार, लोणावळा(नाणे मावळ) मंडल अध्यक्ष अनंता गायकवाड यांचा भव्य सत्कार होणार आहे.
तरी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पक्षावर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी या सत्कार समारंभाला उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा क्षेत्र यांनी केले आहे
गणेश नामदेव भेगडे




















