इतिहास संशोधक डाॅ प्रमोद बोराडे उलगडणार किल्ले लोहगडाचा इत्यंभूत इतिहास
तळेगाव दाभाडे : फ्रेंड्स ऑफ नेचर संस्था आणि लायन्स क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव स्टेशन येथील निसर्ग अभ्यासिकेमध्ये शुक्रवार दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजता किल्ले लोहगडाचा युनोस्को या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश झाल्याच्या निमित्ताने आनंदोत्सव. शोभायात्रा व साखर वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात इतिहास संशोधक. दुर्ग अभ्यासक.डाॅ प्रमोद सोमनाथ बोराडे हे किल्ले लोहगडाचा अपरिचित इतिहास व्याख्यानाच्या माध्यमातून उलगडणार आहेत. तसेच लोहगड विसापूर विकास मंचाच्या पदाधिकारी व स्वयंसेवकांचा सत्कार याप्रसंगी केला जाणार आहे. तरी शिवभक्त नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११



















