Homeराजकीयकांब्रे कोडिवडे ग्रुप ग्रामपंचायत च्या सरपंच पदी पिंकी राऊत यांची बिनविरोध निवड

कांब्रे कोडिवडे ग्रुप ग्रामपंचायत च्या सरपंच पदी पिंकी राऊत यांची बिनविरोध निवड

कामशेत : नाणे मावळ विभागातील कांब्रे कोडिवडे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच पदी शेतकरी कुटुंबातील पिंकी हेमंत राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते सरपंच स्वामी गायकवाड यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात सोमवार दिनांक २१जुलै २०२५ रोजी ग्रामसभा घेण्यात आली. या सभेत पिंकी राऊत यांची सरपंच पदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक चव्हाण भाऊसाहेब यांनी काम पाहिले.

बिनविरोध निवड जाहीर होतात पिंकी राऊत यांच्या समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला. यावेळी बोलताना नवनिर्वाचित सरपंच पिंकी राऊत म्हणाल्या की गावकऱ्यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन. सर्व ग्रामपंचायत सदस्यांना बरोबर घेऊन गावच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

या वेळी ग्रामसेवक चव्हाण भाऊसाहेब, माजी सरपंच स्वामी गायकवाड, सुवर्णा गायकवाड. सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ गायकवाड, कविता बाबाजी गायकवाड, किरण लक्ष्मण गायकवाड, आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य. कांब्रे कोडिवडे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!