किल्ले लोहगडाकडे जाणारा रस्ता अरुंद व धोकादायक असल्याने त्या रस्त्याचे रुंदीकरण आणि डागडुजी करण्याची मागणी लोहगड विसापूर विकास मंच यांच्याकडून करण्यात आली आहे
वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील लोहगड भाजे या अरुंद आणि नादुरुस्त रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे भाजे लेणी लोहगड येथे येणारे पर्यटक त्रस्त झाले आहेत. या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण व डागडुजी करण्याची मागणी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचालित लोहगड विसापूर विकास मंचाकडून करण्यात आली आहे.
या संदर्भात लोहगड विसापूर विकास मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे. बसप्पा भंडारी व पदाधिकाऱ्यांनी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन दिले आहे. लोहगड भाजे हा रस्ता अतिशय अरुंद असून तो धोकादायक बनला आहे. साईट पट्ट्यावर मोठे खड्डे पडल्यामुळे शिवप्रेमींना गडावर जाण्यासाठी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
पावसाळ्यात या ठिकाणी हजारो पर्यटक येत असतात. लोहगड चे जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नामांकन झाले आहे. तसेच भाजे येथील बौद्ध लेणी येथे अनेक विदेशी पर्यटक व बौद्ध धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने भेट देत असतात. त्यामुळे लोहगड भाजे या अरुंद रस्त्याचे रुंदीकरण करून डागडुजी करावी. तसेच या मार्गावरील संपूर्ण घाट क्षेत्रात नो पार्किंग झोन करावा. रुंदीकरण होईपर्यंत वनवे केल्यास वाहतूक कोंडीतून बऱ्यापैकी सुटका होईल. हुल्लडबाजी करणाऱ्यांवर वाचक राहण्यासाठी येथे पोलिसांची पेट्रोलिंग वाढवावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
लोहगड विसापूर विकास मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे, अध्यक्ष विश्वास दौंडकर, मार्गदर्शक संदीप गाडे, सचिन निंबाळकर, कार्याध्यक्ष सागर कुंभार, खजिनदार अनिकेत आंबेक,. सदस्य बसप्पा भंडारी, गणेश उंडे, ओमकार मेढी, चेतन जोशी, अमोल गोरे, अजय मयेकर, अमोल मोरे, संदीप भालेकर, सिद्धार्थ जाधव, आदी कार्यकर्ते व पदाधिकारी याबाबत सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करत आहे.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















