Homeसामाजिकतरुणांनी व्यसनापासून दूर राहावे – तहसीलदार विक्रम देशमुख

तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे – तहसीलदार विक्रम देशमुख

वडगाव मावळ : येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य बीए महाविद्यालय येथे नवोदित विद्यार्थ्यांच्या स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तरुणांनी व्यसनापासून दूर राहण्याचे, मोबाईलचा अतिवापर टाळण्याचे आणि समाजमाध्यमांच्या आहारी न जाण्याचे आवाहन केले.

देशमुख म्हणाले, “विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून त्यासाठी प्रयत्नशील राहावे. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना आत्मविश्वास, चिकाटी आणि परिश्रम या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. कोणत्याही क्षेत्रातील शिखर गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे सचिव अशोक बाफना होते. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “डिजिटल साधने ही ज्ञानाचे भांडार आहेत. विद्यार्थ्यांनी या साधनांचा सदुपयोग करून अभ्यासात प्रगती साधावी.”

या वेळी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले, उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे, संचालक प्रल्हाद जांभुळकर, राजेश बाफना, चंद्रकांत ढोरे, प्रा. डॉ. शितल शिंदे, डॉ. जया धावरे, योगेश जाधव, प्रियंका पाटील, प्रणिता सूर्यवंशी, अनिल कोंद्रे, प्रा. केंगले, प्रा. ठाकरे, प्रा. ओव्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोहिणी चंदनशिवे यांनी केले. प्राचार्य अशोक गायकवाड यांनी प्रस्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. महादेव वाघमारे यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन डॉ. शितल दुर्गाडे यांनी मानले.

(प्रतिनिधी गणेश नामदेव भेगडे)  ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!