Homeमहत्त्वाचेतळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा डेंग्यूविरोधात 'हर रविवार' डेंग्यू पर वार विशेष उपक्रम: विद्यार्थ्यांच्या...

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा डेंग्यूविरोधात ‘हर रविवार’ डेंग्यू पर वार विशेष उपक्रम: विद्यार्थ्यांच्या सहभागाने आरोग्य जनजागृती

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा डेंग्यूविरोधात ‘हर रविवार’ डेंग्यू पर वार विशेष उपक्रम: विद्यार्थ्यांच्या सहभागाने आरोग्य जनजागृती

तळेगाव दाभाडे : डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने “हर रविवार होगा डेंग्यू पर वार” या विशेष आरोग्य जनजागृती उपक्रमाची सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून कुटुंबांपर्यंत आरोग्याचा संदेश पोहोचवणे, हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

बुधवार दिनांक २ जुलै २०२५ रोजी नगरपरिषद कार्यालयात नगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्याधिकारी  विजयकुमार सरनाईक यांनी डेंग्यू आणि मलेरियामुळे उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांवर चिंता व्यक्त करत यावर ठोस उपाययोजनांची गरज अधोरेखित केली.

या उपक्रमांतर्गत, प्रत्येक विद्यार्थ्याला एक विशेष आरोग्य पत्रक वितरित केले जाईल. या पत्रकानुसार, दर रविवारी विद्यार्थ्यांना घरी एक छोटी आरोग्यविषयक कृती करायची आहे. यामध्ये घरातील पाणीसाठा तपासणे, परिसराची स्वच्छता राखणे, पाणी साठवणाऱ्या वस्तू नष्ट करणे आणि भांडी कोरडी ठेवल्याची खात्री करणे, अशा कामांचा समावेश आहे. शिक्षकांनी दर सोमवारी विद्यार्थ्यांकडून या कृतींची तपासणी करायची असून, त्यांना डेंग्यू व मलेरियाच्या प्रतिबंधात्मक उपायांबद्दल सविस्तर माहिती द्यायची आहे.

यामुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ शालेय शिक्षण न राहता, समाजहिताची जाणीव निर्माण होईल आणि आरोग्य शिक्षणाचा भाग म्हणून हा उपक्रम अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या बैठकीत पंचायत समिती वडगाव-मावळ येथील विस्तार अधिकारी दिलीप ठोंबरे यांनी डेंग्यू प्रतिबंधासाठी आवश्यक काळजीविषयी मार्गदर्शन केले.

त्यांनी घर व परिसर स्वच्छ ठेवणे, आठवड्यातून एकदा पाणी साठवणारी भांडी व टाक्या रिकाम्या करून स्वच्छ करणे, पूर्ण बाह्यांचे कपडे वापरणे, मच्छरदाणी व डास प्रतिबंधक उपायांचा वापर करणे आणि पावसाळ्यात पाणी साचू न देणे यांसारख्या महत्त्वाच्या सूचना दिल्या. या उपक्रमामुळे शाळा, विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये स्वच्छता व आरोग्याविषयीची जागरूकता वाढेल आणि डेंग्यू व मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल, अशी अपेक्षा तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने व्यक्त केली आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!