तळेगाव दाभाडे शहराचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद
तळेगाव दाभाडे – शहरातील नागरिकांना उद्या शुक्रवार, दिनांक २६ सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती नगरपरिषदेकडून देण्यात आली आहे.
नगरपरिषदेचे अभियंता अभिषेक शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेतील सोमाटणे जॅकवेल ते चौराई जलशुद्धीकरण केंद्र या दरम्यानच्या परिसरात विद्युत वाहिन्यांना अडथळा करणाऱ्या झाडांच्या वाढलेल्या फांद्या तोडण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी संबंधित भागात विद्युत पुरवठा खंडित होणार असल्याने पाणी उपसा व शुद्धीकरण प्रक्रिया थांबणार आहे.
त्यामुळे शुक्रवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत तळेगाव दाभाडे शहरातील संपूर्ण गाव भाग तसेच स्टेशन परिसरातील वडगाव फाटा ते स्टेशन चौक या दरम्यानचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, या काळात पाण्याचा योग्य वापर करावा व आवश्यकतेनुसार पाणी साठवून ठेवावे. तसेच गैरसोयीबद्दल नगरपरिषदेकडून खेद व्यक्त करण्यात आला आहे.
(प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे)९९२१८०७०११



















