Homeशिक्षण-प्रशिक्षणतळेगाव दाभाडेचा अभिमान.कु. अल्फीया अन्वर शिकीलकर झाली चार्टर्ड अकाऊंटंट; दीपक भेगडे यांनी...

तळेगाव दाभाडेचा अभिमान.कु. अल्फीया अन्वर शिकीलकर झाली चार्टर्ड अकाऊंटंट; दीपक भेगडे यांनी भेट देऊन केला सत्कार

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषद चे माजी नगरसेवक अयुबभाई शिकीलकर यांची पुतणी आणि अन्वरभाई शिकीलकर यांची कन्या कु. अल्फीया अन्वर शिकीलकर हिने चार्टर्ड अकाऊंटंट (CA) परीक्षेत यश मिळवत कुटुंबासह संपूर्ण तळेगावचा मान वाढवला आहे. कठोर परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर अल्फीयाने हे उल्लेखनीय यश संपादन केले असून, तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक व गौरव होत आहे.

या अभिमानास्पद यशानिमित्त तळेगाव दाभाडे प्रभाग क्र. १३ चे इच्छुक नगरसेवक दीपक निवृत्ती भेगडे यांनी अल्फीया शिकीलकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन तिचा सन्मान व सत्कार केला. यावेळी त्यांनी अल्फीयाचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दीपक भेगडे म्हणाले, कि अल्फीयाने आपल्या परिश्रमातून समाजातील तरुणांसमोर एक प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे. तिच्या या यशामुळे तळेगाव दाभाडेचे नाव उज्ज्वल झाले आहे.”

या कार्यक्रमास शिकीलकर जमातचे अध्यक्ष अजीजभाई शिकीलकर, अन्वरभाई शिकीलकर, उद्योजक संदीप भेगडे, गणेश आप्पा भेगडे, रामभाऊ भेगडे, गणेश सातकर, नीरज भेगडे, रियाजभाई शिकीलकर, सोहेल शिकीलकर, साजिदभाई शेख, प्रेमनाथ परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

अल्फीयाने आपल्या यशाचे श्रेय पालकांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे सहकार्य आणि स्वतःच्या अथक प्रयत्नांना दिले. ती पुढे फाइनान्शियल कन्सल्टंसी आणि ऑडिटिंग क्षेत्रात कार्य करण्याची इच्छा व्यक्त करत आहे.

तळेगाव दाभाडेतील युवक-युवतींसाठी हे यश प्रेरणादायी ठरले असून तिच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

प्रतिनिधी :गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!