
तळेगाव दाभाडेत ‘शिवशंभु वंदना’व मारूती महाआरती उपक्रम सुरू
तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने ‘शिवशंभु वंदना’ हा धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम सुरू होणार आहे. हा उपक्रम दर रविवारी सायंकाळी ७ वाजता शिवशंभु तीर्थ, तळेगाव दाभाडे येथे आयोजित केला जाणार आहे.


उपक्रमामध्ये सामूहिक वंदना, घोषवाक्ये आणि प्रेरणादायी विचार सादर केले जातील. यामुळे भक्तांमध्ये धार्मिक भावनांचा अनुभव, संस्कार आणि समाजातील ऐक्य वाढेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.


याच उपक्रमाचा एक भाग म्हणून दर शनिवारी सायंकाळी ८ वाजता गणपती (चावडी) चौक येथील मारुती मंदिरात महाआरती व एकत्रीकरणाचे आयोजनही सुरू होणार आहे. या कार्यक्रमाद्वारे उपस्थित भाविकांना सामूहिक भक्तीचा अनुभव घेता येईल, तसेच परंपरा जपण्यास आणि तरुणांमध्ये संस्कार रुजवण्यास मदत होणार आहे.


विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी सर्व भाविकांना वेळेत उपस्थित राहून या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तळेगाव दाभाडेकरांमध्ये या उपक्रमाची उत्सुकता वाढत असून, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात या उपक्रमाचे महत्त्व वाढणार आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















