प्रतिनिधी – गणेश नामदेव भेगडे
मावळ १३ मे : रानमेवा विक्रीसाठी शहरात दाखल मावळ तालुक्यातील दुर्गम भागातून तळेगाव दाभाडे. वडगाव. कामशेत. लोणावळा या शहरात रानमेवा विक्रीसाठी दाखल झाला आहे. यामध्ये करवंद. जांभूळ. ताडगोळे. कैऱ्या. फणस व इतर रानमेव्याच्या समावेश आहे.
रानमेव्याच्या विक्रीतून ग्रामीण भागातील आदिवासी महिलांना रोजगार मिळतो हा रानमेवा केवळ चवीलाच अप्रतिम नसून तो पोषण मूल्यांनी परिपूर्ण आहे. जांभूळ व करवंद त्यांच्यात अॅटी आॅक्सिडंट्स व लोहाचे प्रमाण अधिक असतात. फणसामध्ये भरपूर फायबर्स आणि अन्नपचनास मदत करणारी पोषक तत्वे असतात. रानमेव्याचा उपयोग हा पारंपरिक आयुर्वेदिक औषधांमध्ये होत असतो. सध्या हंगाम सुरू असल्याने आदिवासी महिला रानमेवा घेऊन शहरात दाखल झाल्या आहेत. याविषयी बोलताना मावळ दर्पण न्युज चे सदस्य गणेश दाभाडे म्हणाले की प्रत्येक शहरात व गावात तसेच प्रामुख्याने आदिवासी भागात रानमेवा उद्यान निर्माण केली पाहिजे.
यामुळे रानमेवा संवर्धित होईल उन्हाळ्यामध्ये डोंगरांना वनवे लावले जातात त्यामुळे इतर झाडांसह रान मेव्याची झाडे जळून नष्ट होतात त्यामुळे रानमेवा पूर्वीसारखा आता जास्त प्रमाणात बाजारात विक्रीसाठी येत नाही त्यामुळे काहीजण स्पीड बॉल या उपक्रमातून रानफळांच्या बिया मातीच्या गोळ्यात ठेवून पावसाळ्यात जंगलात रुजवत आहे.मावळ मधील निसर्गप्रेमी संस्थांनी फळबियांच्या बँक करण्याचे काम ग्रामीण भागात सुरू करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.






















