Homeक्राईमन्यायालयाच्या आवारातून आरोपीची पोलीस कोठडीतून धाडसी पळ काढण्याची घटना; आणखी एक गुन्हा...

न्यायालयाच्या आवारातून आरोपीची पोलीस कोठडीतून धाडसी पळ काढण्याची घटना; आणखी एक गुन्हा दाखल

न्यायालयाच्या आवारातून आरोपीची पोलीस कोठडीतून धाडसी पळ काढण्याची घटना; आणखी एक गुन्हा दाखल

वडगाव मावळ, दि. २८ (प्रतिनिधी): वडगाव मावळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या आवारातून पोलीसांच्या ताब्यातील आरोपीने बेडीसह पळ काढल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी घडली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 262 अन्वये वडगाव मावळ पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमरान गफार शेख (वय 20, रा. सिद्धार्थ नगर, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे) यास कामशेत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात न्यायालयात हजर करण्यात आले होते. सकाळी सुमारे 10.35 वाजण्याच्या सुमारास न्यायालयाने आरोपीला रिमांड दिल्यानंतर पोलीस कर्मचारी त्याला न्यायालयाबाहेर आणत होते.

यावेळी पोलीस शिपाई मारकड यांनी आरोपीच्या हातात बेडी घालून तिची चावी खिशात ठेवत असताना आरोपीने अचानक झटापट केली. पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला हिसका देत आरोपी इमरान शेख हा बेडीसह पोलीसांच्या कायदेशीर ताब्यातून पळून गेला. या घटनेमुळे न्यायालय परिसरात काही काळ एकच खळबळ उडाली.

या प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई कैलास बबन गारगोटे (बकल नं. 424) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 199/2026 नोंद करण्यात आला आहे.

घटनेची माहिती तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असून वर्दी रिपोर्ट प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, वडगाव मावळ न्यायालयाकडे पाठविण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असून विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास GPSI जाधवराव करीत असून दाखल अमलदार म्हणून सहायक फौजदार काळे यांनी कामकाज पाहिले आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीसांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!