Homeमहत्त्वाचेबोरज गावात १२ फूट अजगराला वन्यजीव रक्षक संस्था मावळ व आपदा मित्र...

बोरज गावात १२ फूट अजगराला वन्यजीव रक्षक संस्था मावळ व आपदा मित्र यांनी सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले

बोरज : मावळ तालुक्यातील बोरज गावात शनिवारी रात्री सुमारे १२ फूट लांब अजगर साप आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली. मात्र वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वेळेवर दाखल होत अजगराला सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.

ही घटना रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सर्पदर्शनाची माहिती मिळताच गावकऱ्यांनी दक्ष काटकर यांना संपर्क केला. अवघ्या २० मिनिटांत ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अत्यंत कुशलतेने त्या अजगराचा रेस्क्यू केले . या मोहिमेत वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे अध्यक्ष अनिल आंद्रे आणि आपदा मित्र मावळचे स्वयंसेवकही उपस्थित होते.

अजगराला कोणतीही इजा न करता त्याचे सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले आणि लगेचच त्याला जंगलातील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या कार्यवाहीबद्दल ग्रामस्थांनी दक्ष काटकर, अनिल आंद्रे व त्यांच्या पथकाचे आभार मानले.

ही माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक नीलेश संपतराव गराडे यांनी दिली. त्यांनी सांगितले की, कुठेही सर्प अथवा कोणताही वन्य प्राणी आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ 9822555004 या क्रमांकावर किंवा वन विभागाच्या टोल फ्री 1926 क्रमांकावर संपर्क साधावा. अशा प्रकारच्या सूचित आणि वेळेवर कारवाईमुळे प्राणी व मानव दोघांचेही संरक्षण शक्य होते.
प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!