Homeराजकीयभाजप महायुती म्हणूनच मावळ तालुक्यात निवडणूका लढणार. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची...

भाजप महायुती म्हणूनच मावळ तालुक्यात निवडणूका लढणार. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची माहिती

भाजप महायुती म्हणूनच मावळ तालुक्यात निवडणूका लढणार. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची माहिती

तळेगाव दाभाडे : भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना माजी राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले की मावळ तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष महायुतीच्या माध्यमातून लढणार आहे अशी माहिती माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी दिली आहे.

राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपंचायती, नगरपरिषद आणि महानगरपालिका अशा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून लवकरच त्यांच्या तारखा जाहीर होणार आहेत. या निवडणुका राज्यातील सत्ताधारी महायुती म्हणून लढण्यात येणार असून मावळ तालुक्यात भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष( अजित पवार गट) शिवसेना( एकनाथ शिंदे गट) एकत्रितपणे लढतील.

मावळ तालुक्यातील सर्व घटक पक्षांच्या वरिष्ठांनी एकत्र बसून जागा वाटपाचा निर्णय घ्यावा असे बाळा भेगडे यांनी स्पष्ट केले. जेथे एकमत होणार नाही तेथे मैत्रीपूर्ण लढती होतील असेही त्यांनी सांगितले. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी तळेगाव दाभाडे नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे माजी नगरसेवक संतोष दाभाडे( पाटील) यांचे नाव जाहीर केले आहे.

या विषयाच्या अनुषंगाने बाळा भेगडे म्हणाले की शेळके यांनी आपल्या पक्षातील इच्छुकांची नावे जाहीर करावीत. दुसऱ्या पक्षातील उमेदवाराबाबत मौन बाळगावे. हे युतीसाठी हितवाह नाही त्यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील उमेदवारांची नावे दिली असती तर आम्हाला आक्षेप नसता. त्यांच्या पक्षाकडे कदाचित सक्षम उमेदवार नसेल म्हणूनच त्यांनी भाजपाच्या उमेदवारीची घोषणा केली असावी असा सूचक टोला बाळा भेगडे यांनी लागवला.

पत्रकार परिषदेच्या वेळी महाराष्ट्र प्रदेश किसान संघाचे प्रदेशाध्यक्ष गणेश किसनराव भेगडे, मंडल अध्यक्ष चिराग खांडगे, माजी नगरसेवक रघुवीर शेलार, माजी नगरसेवक सचिन टकले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती; नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन वडगाव मावळ दि. २७ : आगामी...

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू कान्हे फाटा येथे कंटेनरची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ वडगाव मावळ दि. २७ : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात...

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल वडगाव मावळ, दि. 24 : जनगणना 2027 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शासकीय प्रगणकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतरही...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी वडगाव मावळ, दि. १९ : येथील रयत शिक्षण संस्था संचालित...

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

error: Content is protected !!