Homeमहत्त्वाचेमावळ तालुक्यातील आंबी येथील स्मशानभूमीत जादूटोण्याचा प्रकार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मावळ तालुक्यातील आंबी येथील स्मशानभूमीत जादूटोण्याचा प्रकार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

आंबी : मावळ तालुक्यातील आंबी गावातील स्मशानभूमीत अज्ञात व्यक्तीने जादूटोणा केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्मशानभूमी परिसरात काळ्या बाहुल्या .लिंबू, काळे धागे, नारळ, भस्म, कापडाचे तुकडे .फोटो. टाचण्या आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सकाळच्या सुमारास स्मशानभूमीकडे गेलेल्या ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर ही माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली.

या घटनेमुळे महिलांमध्ये व ज्येष्ठ नागरिकांमध्ये विशेषतः दहशत निर्माण झाली असून, या आघोरी कृत्यामुळे नागरिक स्मशानभूमीकडे जाणे टाळत आहे. गावातील शांततेला बाधा पोहोचवणारा हा प्रकार असून अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. ग्रामस्थांनी तत्काळ सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना याची माहिती दिली.

घटनास्थळी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. संशयास्पद साहित्य हटविण्यात आले असून स्वच्छता करण्यात आली. याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अशा अंधश्रद्धापूर्ण कृत्यांमुळे समाजात भीती पसरत असल्याने दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!