Homeमहत्त्वाचेमावळ तालुक्यातील राजमाची किल्ल्याजवळील फणसराई येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई

मावळ तालुक्यातील राजमाची किल्ल्याजवळील फणसराई येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई

मावळ तालुक्यातील राजमाची किल्ल्याजवळील फणसराई येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई

लोणावळा : मावळ तालुक्यातील लोणावळा शहराच्या जवळच असलेल्या राजमाची किल्ल्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या फणसराई या वस्तीवर पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. येथील नागरिकांना हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी ४ते ५ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. फणसराई हा भाग निसर्ग संपन्न असून.

अशा या फणसराई मध्ये धनगर व कातकरी या कष्टकरी लोकांची वस्ती आहे. या वस्तीमध्ये साधारण १५ते १८ कुटुंब राहत असून या ठिकाणी एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून खोदलेल्या विहिरी मधून त्यांना ८ते १० महिने पिण्याच्या पाण्याची सोय होते. मार्च महिन्यानंतर मात्र या विहिरीमधील पाणी जवळपास संपलेले असते.

येथील नागरिकांना उन्हातानात पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा फिरावे लागत आहे. एकीकडे मावळ तालुक्यात सर्वत्र जलजीवन मिशनच्या माध्यमातून पिण्याचे पाणी पोचवण्यासाठी सुरू असलेली योजना पूर्ण करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे तर दुसरीकडे मात्र मावळ तालुक्यातील फणसराई येथील नागरिकांना पिण्याचे पाणी या जनजीवन मिशन अंतर्गत मिळत नाही हे वास्तव आहे. येथील नागरिक आर्थिक दृष्ट्या अत्यंत गरीब असून दुप्पट पैसे देऊन पिण्याचे पाणी विकत घेणे या गरीब व कष्टकरी नागरिकांना परवडत नाही.

येथील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करणे गरजेचे आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी देखील या ठिकाणी लक्ष देत फणसराई या वस्तीवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी फणसराई येथील धनगर व कातकरी या कष्टकरी समाजातील नागरिकांनी केली आहे.

प्रातिनिधि: गणेश नामदेव भेगडे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!