Homeसामाजिकमेघाताई प्रशांतदादा भागवत यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त १०६ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान...

मेघाताई प्रशांतदादा भागवत यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त १०६ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले

इंदोरी (ता. मावळ) : मेघाताई प्रशांतदादा भागवत यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सकल मराठा समाज मावळ तालुका व प्रशांतदादा भागवत युवा मंच यांच्या वतीने इंदोरी गावातील हनुमान मंदिर हॉलमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. बुधवार, दि. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या या शिबिरात तब्बल १०६ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. समाजसेवेची प्रेरणा व मानवतेचा संदेश देणारे हे रक्तदान शिबिर अत्यंत यशस्वी ठरले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. सरपंच दामोदर शिंदे, ज्येष्ठ नेते बबनराव ढोरे, मा. चेअरमन अरविंद शेवकर, मा. जि.प. सदस्य प्रशांत ढोरे, भाजप नेते मनोहर दिगंबर भेगडे, कामगार नेते रामचंद्र ढोरे, सरपंच शशिकांत शिंदे, उपसरपंच जयश्री सावंत, मा. उपसरपंच संदीप ढोरे, इंदोरी शहर रा.काँग्रेस अध्यक्ष दिनेश चव्हाण, मा. उपसरपंच आशिष ढोरे, मा. सरपंच प्रदीप काशिद, उद्योजक आतुल मराठे, उद्योजक संकेत शिंदे, खरेदी विक्री संघाचे संचालक निलेश मराठे, मा. सभापती ज्योतीताई शिंदे, मा. सरपंच शोभाताई शिंदे, ग्रा.पं. अध्यक्ष वर्षाताई नवघणे, मा. पं.स. सदस्य लीलाताई कोतुळकर, पुष्पा घोजगे, संगीता घोजगे, रा.काँ. म. अध्यक्ष राजश्री राऊत, मा. उपसरपंच धनश्री काशिद, अंकिता ढोरे, बेबी बैकर, रेश्मा शिंदे यांसह सा.का. विष्णु खांदवे, मनोहर काशिद, जयंत राऊत, भाजपा इंदोरी शहराध्यक्ष मनोहर पानसरे, मा. उपसरपंच संदीप नाटक, दिपक राऊत, भरत नाना घोजगे, भानुदास दरेकर, बाबासाहेब घोजगे, प्रकाश घोजगे, मा. सरपंच रमेश घोजगे, मा. सरपंच मधुकर आप्पा ढोरे, सा.का. नामदेव पानसरे, अशोक शिंदे तसेच समस्त ग्रामस्थ व प्रशांतदादा भागवत युवा मंचाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिराच्या निमित्ताने थॅलसिमिया आणि ऍनिमिया या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. अशा रुग्णांना महिन्याला लागणारे रक्त सौ. मेघाताई प्रशांतदादा भागवत व प्रशांतदादा भागवत युवा मंच यांच्या वतीने पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. परिसरात असे रुग्ण असल्यास त्यांच्याशी संपर्क साधून आवश्यक ते सहकार्य मिळू शकते, असेही आवाहन करण्यात आले.

समाजहिताचा संदेश देत आणि मानवतेची ज्योत प्रज्वलित करणारे हे रक्तदान शिबिर ग्रामस्थांच्या सहभागामुळे अत्यंत प्रभावी आणि यशस्वी ठरले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!