Homeमहत्त्वाचेरविवारी गोल्डन रोटरीची सायक्लोथॉन पर्यावरण जनजागृतीसाठी सायकल रॅलीचे आयोजन

रविवारी गोल्डन रोटरीची सायक्लोथॉन पर्यावरण जनजागृतीसाठी सायकल रॅलीचे आयोजन

रविवारी गोल्डन रोटरीची सायक्लोथॉन पर्यावरण जनजागृतीसाठी सायकल रॅलीचे आयोजन

तळेगाव दाभाडे : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्या वतीने गोल्डन रोटरी सायक्लोथॉन 2026 या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी, दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता मारुती मंदिर चौक, तळेगाव दाभाडे येथून या रॅलीला सुरुवात होणार आहे. तळेगाव दाभाडे नगर परिषद व रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या सायक्लोथॉनचे उद्घाटन पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र हुड्डी यांच्या हस्ते होणार असून मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके, माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच तळेगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, तळेगावचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील, रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नितीन ढमाले आणि स्पोर्ट्स डायरेक्टर दीपक फल्ले हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पर्यावरण पूरक जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी या सायकल रॅलीत विशेष आकर्षण म्हणून निसर्गाशी संबंधित सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी स्पर्धकांनी सायकलला पर्यावरणपूरक संदेश देणारी सजावट करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पर्यावरण रक्षण, वृक्षसंवर्धन आणि प्रदूषणमुक्त शहराचा संदेश या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

या उपक्रमाविषयी माहिती देताना गोल्डन रोटरीचे अध्यक्ष संतोष परदेशी म्हणाले की, पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून युवक व विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सायक्लोथॉन हा प्रभावी उपक्रम आहे. मोठ्या संख्येने नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा.

प्रकल्प प्रमुख हर्षद जव्हेरी यांनीही विद्यार्थ्यांना विशेष आवाहन करताना सांगितले की, सहभागी प्रत्येकास मेडल, टोपी व अल्पोपहार देण्यात येणार आहे. शहरातील विविध शाळा, महाविद्यालये व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!