
रोटरी क्लब तळेगाव एम.आय.डी.सी.च्या कार्याचे डी.जी. संतोष मराठे यांच्याकडून कौतुक
२७ सामाजिक प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी; ‘सर्विस एक्सलन्स अवॉर्ड’ रामदास वाडेकर यांना प्रदान
तळेगाव दाभाडे : रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी.ची अधिकृत डी.जी. व्हिजिट दिनांक ८ नोव्हेंबर २०२५ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण आणि औत्सुक्याच्या वातावरणात पार पडली. या प्रसंगी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर (डी.जी.) रो. संतोष मराठे, फर्स्ट लेडी रो. तनुजा मराठे, असिस्टंट गव्हर्नर (ए.जी.) रो. अशोक शिंदे आणि फाउंडेशन डायरेक्टर रो. राजेश राऊत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ५.३० वाजता डी.जी. यांच्या आगमनाने झाली. प्रारंभी डायस कमिटी आणि स्ट्रॅटेजिक कमिटीसोबत बैठक पार पडली. त्यानंतर बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या बैठकीत फाउंडेशन, मेंबरशिप, पब्लिक इमेज आणि सर्विस प्रोजेक्ट्स या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत रो. दीपक बागल (फाउंडेशन), माजी अध्यक्ष रो. अजय पाटील (मेंबरशिप), रो. योगेश शिंदे (पब्लिक इमेज), रो. युवराज पोटे (सर्विस प्रोजेक्ट्स) आणि सचिव रो. संदीप मगर यांनी आपापल्या विभागातील उपक्रमांची माहिती सादर केली.


दीपप्रज्वलनाने जनरल मीटिंगला सुरुवात झाली. सूत्रसंचालन रो. लक्ष्मण मखर यांनी केले. अध्यक्ष रो. प्रवीण भोसले यांनी प्रास्ताविकात सांगितले की, फक्त चार महिन्यांत क्लबने तब्बल २७ सामाजिक प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत.
डी.जी. रो. संतोष मराठे यांनी क्लबच्या कार्याचे “शंभर मार्क्स देत” मनापासून कौतुक केले. तर ए.जी. रो. अशोक शिंदे यांनी “ग्रेट वर्क अँड क्लब बिल्डिंग” असे म्हणून टीमस्पिरिटचे अभिनंदन केले.


कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ‘सर्विस एक्सलन्स रोटरी अवॉर्ड’ प्रदान समारंभ. या वर्षीचा सन्मान पत्रकार रामदास वाडेकर यांना डी.जी. रो. मराठे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, रोप, ‘तळेगाव इतिहास’ पुस्तक व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
त्यांचा परिचय रो. लक्ष्मण मखर यांनी करून दिला, तर संस्थापक अध्यक्ष रो. संतोषजी खांडगे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. वाडेकर यांनी पत्रकारितेद्वारे मावळातील सामाजिक प्रश्नांना न्याय मिळवून देणे आणि १५ गावांतील मुलींसाठी “सायकल बँक” सुरू करून शिक्षण सुलभ करण्याच्या उपक्रमाची विशेष दखल घेण्यात आली.
नुकत्याच नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे तिसऱ्यांदा सचिव म्हणून निवड झाल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष रो. संतोषजी खांडगे यांचा देखील सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात डी.जी. रिपोर्टचे अनावरण डी.जी. मराठे यांच्या हस्ते झाले. त्यांनी क्लबच्या सेवाभावाचे कौतुक करत सामाजिक प्रकल्पांना अधिक गती देण्याचे आवाहन केले.
रोटल बुलेटिनचे प्रकाशन डी.जी. यांच्या हस्ते पार पडले. बुलेटिन संपादक रो. सुमती निलवे व सहसंपादक रो. गौरी पाटील यांनी बुलेटिन सादर केले.
माजी अध्यक्ष विन्सेंट सालेर यांनी फाउंडेशनसाठी ₹२५,०००/- चा धनादेश फाउंडेशन डायरेक्टर रो. राजेश राऊत व डी.जी. मराठे यांच्याकडे सुपूर्द केला.
रो. बाळासाहेब शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले, तर सचिव रो. संदीप मगर यांनी कार्यक्रमाची औपचारिक घोषणा केली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सदस्य आणि पाहुण्यांनी रुचकर भोजनाचा आस्वाद घेत या संस्मरणीय संध्याकाळीचा आनंद लुटला.



















