वडगांव शहरात भटक्या कुत्र्यांचा हल्यात आठ वर्षीची मुलगी गंभीर जखमी. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त नगरपंचायतीने करावा वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
वडगांव मावळ : वडगाव शहरातील सर्व भटक्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा. व अशी दुर्दवी घटना परत या वडगाव शहरात घडू नये याची काळजी वडगाव नगर पंचायत ने घ्यावी. असे निवेदन वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वडगाव नगरपंचायतला देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी मावळ तालुका वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, वडगाव शहर राष्ट्रवादी अध्यक्ष प्रवीण ढोरे, वडगाव शहर युवक अध्यक्ष अतुल ढोरे, संतोष निघोजकर, अक्षय बेल्हेकर, तानाजी थडगे, गणेश झरेकर, विकास कदम आदी उपस्थित होते.
वडगाव शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये वावर वाढला असून सामान्य नागरिक व लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे दि.६ अगस्त २०२५ या दिवशी वडगाव शहर मधील केशवनगर भागामध्ये प्रियांशु पवन गायकवाड वय 8 वर्ष्याच्या मुलीवर चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला त्यावेळी तेथील नागरिकांनी धाव घेत मुलीचा जिव वाचवला तरी मुलगी मोठ्या प्रमाणावर जखमी झालेली आहे




















