Homeराजकीयवडगाव नगरपंचाय निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप आमनेसामने – नगराध्यक्ष पदासाठी...

वडगाव नगरपंचाय निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप आमनेसामने – नगराध्यक्ष पदासाठी थेट लढत

वडगाव नगरपंचाय निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप आमनेसामने – नगराध्यक्ष पदासाठी थेट लढत

वडगाव मावळ │ वडगाव नगरपंचाय निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगत आली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात थेट आणि चुरशीची लढत सुरू झाली आहे. दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेचा प्रश्न मानत ही निवडणूक जोरदार लढविण्याचे संकेत दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार अबोली मयूर ढोरे निवडणूक रिंगणात आहेत. मागील काही वर्षांत केलेल्या विकासकामांचा मुद्दा घेत आणि आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वातील विविध उपक्रमांची नोंद मांडत राष्ट्रवादी काँग्रेस ‘विकास हा मुख्य एजेंडा’ ठेवून मतदारांपर्यंत पोहोचत आहे. शहरातील मूलभूत सुविधा, महिलांसाठी राबवलेले उपक्रम, क्रीडा प्रोत्साहन आणि नागरी विकास यावर आधारलेली मोहीम सध्या वेगाने सुरू आहे.

दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाकडून मृणाल गुलाबराव म्हाळसकर या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार असून पक्षाने निवडणूक थेट नेतृत्वाच्या चेहऱ्यावर लढविण्याची रणनीती स्वीकारली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची छाप मतदारांपर्यंत पोहोचवत भाजप आपला प्रचार उभारते आहे. केंद्री योजनांचा लाभ, पारदर्शक कारभार आणि स्थिर नेतृत्व ही भाजपची प्रमुख मांडणी ठरत आहे.

दोन्ही पक्षांकडून शहरभर प्रचारयंत्रणा वेगाने कार्यरत असून घरोघरी भेटी, सभा, पदयात्रा यांमुळे वडगाव शहरात राजकीय उर्जा वाढली आहे. नागरिकांकडून दोन्ही उमेदवारांना मिळत असलेला प्रतिसाद पाहता निवडणूक काट्याची होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.

आगामी काही दिवसांत प्रचाराचा वेग आणखी वाढण्याची शक्यता असून वडगावचे राजकारण या दुतर्फा संघर्षामुळे अधिक रंगतदार झाले आहे. अंतिम निर्णय मात्र मतपेटीतूनच समोर येणार असून त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!