Homeमहत्त्वाचेवडगाव नगरपंचायतीत "स्वच्छता ही सेवा" अभियान उत्साहात राबविले

वडगाव नगरपंचायतीत “स्वच्छता ही सेवा” अभियान उत्साहात राबविले

वडगाव नगरपंचायतीत “स्वच्छता ही सेवा” अभियान उत्साहात राबविले

वडगाव – गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभर १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत “स्वच्छता ही सेवा” हे अभियान राबविण्यात आले. या राष्ट्रीय उपक्रमाचा भाग म्हणून वडगाव नगरपंचायत मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रविण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

Oplus_16908288

आज २ ऑक्टोबर २०२५ रोजी महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभियानाचा समारोप करण्यात आला. शहराच्या स्वच्छतेसाठी वर्षभर परिश्रम घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांपैकी उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा या वेळी सन्मान करण्यात आला.

Oplus_16908288

शहराच्या हद्दीवरील कातवी–तळेगाव रस्त्यावरील परिसरात मुख्याधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणावर स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात सुमारे ७० कर्मचारी सहभागी झाले व जवळपास तीन मेट्रिक टन कचरा जमा करण्यात आला.

अभियान काळात न्यू इंग्लिश स्कूल, रमेशकुमार सहानी स्कूल, अध्यापक विद्यालय, कला वाणिज्य बीबीए महाविद्यालय आदी शैक्षणिक संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. रांगोळी व चित्रकला स्पर्धा, स्वच्छता रॅली, शपथविधी तसेच सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांनी जनजागृती घडविली.

“स्वच्छता ही सेवा – सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज” अंतर्गत नगरपंचायतीतील सर्व सफाई कर्मचारी व अधिकारी वर्ग यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. सफाई कर्मचाऱ्यांचे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत आरोग्यकार्ड काढण्यात आले, तर प्रधानमंत्री आवास योजना शहरी २.० बाबतही माहिती देण्यात आली.

अभियानाचा समारोप करताना मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम यांनी नागरिकांना आवाहन केले की –

कचरा उघड्यावर न टाकता घंटागाडीत वर्गीकृत स्वरूपात द्यावा

प्लास्टिकचा वापर टाळावा

स्वच्छता उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा

शहराचे विद्रूपीकरण होऊ नये म्हणून प्रशासनास सहकार्य करावे

यापुढे नियमित कचरा टाकल्या जाणाऱ्या ठिकाणांचे सुशोभीकरण करून तेथे सीसीटीव्ही बसवले जाणार असून, उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या माध्यमातून “स्वच्छता ही सेवा” अभियान वडगाव शहरात जनतेच्या सहभागातून यशस्वीरीत्या पार पडले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!