Homeसामाजिकवडगाव मावळ पोलीस स्टेशनतर्फे “रन फॉर युनिटी” — राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त विशेष...

वडगाव मावळ पोलीस स्टेशनतर्फे “रन फॉर युनिटी” — राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त विशेष उपक्रम

वडगाव मावळ (प्रतिनिधी): ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त वडगाव मावळ पोलीस स्टेशन यांच्या वतीने “रन फॉर युनिटी” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एकात्मता, बंधुता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून, सर्व नागरिक, पत्रकार, विद्यार्थी तसेच सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.

या धाव उपक्रमाची सुरुवात पंचायत समिती चौक, वडगाव येथून ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७:३० वाजता होणार आहे.

धाव मार्ग पुढीलप्रमाणे आहे:

पंचायत समिती चौक → श्री पोटोबा महाराज मंदिर → चावडी चौक → मिलिंद नगर चौक → छत्रपती शिवाजी महाराज चौक → श्री खंडोबा मंदिर → पंचमुखी मारुती मंदिर (समाप्ती).

या उपक्रमाबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख यांनी सांगितले की, “राष्ट्रीय एकता दिवस हा देशाच्या एकात्मतेचा आणि ऐक्याचा प्रतीक आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘रन फॉर युनिटी’ उपक्रमाद्वारे आपण समाजात एकतेचा, बंधुत्वाचा आणि देशभक्तीचा संदेश पोहोचवू इच्छितो. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, ही विनंती.”

कार्यक्रमादरम्यान उपस्थित सहभागींसाठी आवश्यक सोयीसुविधांची व्यवस्था पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

राष्ट्रीय एकतेचा संदेश देणारा हा उपक्रम समाजात एकजुटीचा नवा आदर्श निर्माण करेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!