Homeशहरवडगावात विद्यार्थी बनले मूर्तिकार : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडू मातीची कार्यशाळा

वडगावात विद्यार्थी बनले मूर्तिकार : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडू मातीची कार्यशाळा

वडगावात विद्यार्थी बनले मूर्तिकार : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडू मातीची कार्यशाळा

वडगाव नगरपंचायत हद्दीतील सर्व शाळांमध्ये “माझी वसुंधरा अभियान” व “स्वच्छ भारत अभियान” अंतर्गत पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. नगरपंचायत मुख्याधिकारी व प्रशासक डॉ. प्रविण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत जवळपास ३०० शाडू मातीच्या गणेश मूर्ती तयार केल्या. मूर्तिकार  अनिल काळे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे शाडू मातीची मूर्ती कशी घडवायची याचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शाडू मातीचे महत्व व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे होणारे पर्यावरणीय दुष्परिणामही विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी यांनीही विद्यार्थ्यांसोबत मूर्ती बनवून या उपक्रमात सहभाग घेतला.

या कार्यशाळेचे उद्घाटन नगरपंचायत मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम व न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य हाके यांच्या हस्ते झाले. यावेळी टेकचंद नेमाडे, संतोष पवार, दिगंबर बांडे यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी व शिक्षक वृंद यांनी मोलाचे सहकार्य केले. नगरपंचायतीतर्फे विद्यार्थ्यांना शाडू माती व प्रशिक्षक उपलब्ध करून देण्यात आले होते.

मुख्याधिकारी डॉ. निकम यांनी सांगितले की,“गणेशोत्सवाच्या काळात ध्वनी व जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढते. पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केल्यास हे प्रदूषण कमी होऊ शकते. प्रत्येक नागरिकाने या दिशेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुढील वर्षी हा उपक्रम अधिक व्यापक प्रमाणावर राबविण्याचा मानस आहे.”

पर्यावरणपूरक गणेश मंडळ स्पर्धा २०२५ : निकष जाहीर

नगरपंचायत वडगावतर्फे यावर्षी पर्यावरणपूरक गणेश मंडळ स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी पुढील अटी जाहीर करण्यात आल्या आहेत

1. गणेश मंडळांनी नगरपंचायतीची परवानगी घेतलेली असावी.

2. एम.एस.ई.बी. चे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक.

3. स्थानिक पोलीस स्टेशनची परवानगी घ्यावी.

4. गणेश मूर्ती संपूर्णपणे ईको-फ्रेन्डली असावी.

5. सजावटीसाठी प्लास्टिक, थर्माकॉलसारख्या अविघटनशील घटकांचा वापर होऊ नये.

6. निर्माल्य व घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन असावे.

7. मिरवणुकीत केवळ पारंपारिक वाद्यांचा वापर करून ध्वनी व वायुप्रदूषण टाळावे.

8. मंडळाच्या जागी आग विझवणारी उपकरणे असणे बंधनकारक.

9. श्री गणेश मूर्ती नगरपंचायतच्या मूर्ती सकलन केंद्रावर दान करावी.

10. सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्यविषयक उपक्रम (उदा. रक्तदान शिबिर) आयोजित करावेत. तसेच डेंग्यू, मलेरिया, कोरोना प्रतिबंध, स्वच्छतेबाबत जनजागृती करावी.

नगरपंचायतने शहरातील सर्व गणेश मंडळांना या स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून समाजात जागृती निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!