Homeमहत्त्वाचे“श्रीरंग बारणे हाजिर हो!” शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी खासदार श्रीरंग बारणे यांच्या...

“श्रीरंग बारणे हाजिर हो!” शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात चालणार खटला – वडगाव मावळ कोर्टाचा आदेश

“श्रीरंग बारणे हाजिर हो!” शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात चालणार खटला – वडगाव मावळ कोर्टाचा आदेश

वडगाव मावळ : मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. निवडणुकांच्या शपथपत्रात खोटी माहिती दिल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरोधात खटला चालवण्याचे आदेश वडगाव मावळ विशेष न्यायालयाने दिले आहेत.

तक्रारदारांचे गंभीर आरोप

तक्रारदार अनिल भांगरे आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी न्यायालयात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की –

२००९ च्या निवडणुकीच्या शपथपत्रात श्रीरंग बारणे यांनी आपली शैक्षणिक पात्रता “दहावी उत्तीर्ण, सन १९८९” अशी नमूद केली होती.

मात्र, २०१९ च्या निवडणुकीतील शपथपत्रात त्यांनी “दहावी नापास” असे लिहिले.

या दोन शपथपत्रांतील विसंगतीबद्दल तक्रारदारांनी आक्षेप घेतला. तसेच, बारणे यांनी त्यांच्या विरोधातील काही प्रलंबित प्रकरणांची माहिती जाणीवपूर्वक लपवली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यात पिंपरी न्यायालयातील एक प्रकरण व निगडी पोलीस ठाण्यातील एक गुन्हा यांचा समावेश आहे.

न्यायालयाचा हस्तक्षेप

तक्रारीतील मुद्द्यांची दखल घेत न्यायालयाने यापूर्वी वडगाव मावळ पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते. पोलिसांनी चौकशी करून न्यायालयात सविस्तर अहवाल सादर केला.

यानंतर डॉ. हरिदास यांनी न्यायालयात आपले युक्तिवाद मांडले. त्यानंतर न्यायालयाने निष्कर्ष नोंदवला की –

“शैक्षणिक पात्रतेतील विरोधाभास व अपुरी माहिती देणे ही गंभीर बाब आहे. लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ मधील कलम १२५-अ अंतर्गत खटला सुरू करण्यास पुरेशी कारणे आहेत.”

त्यामुळे न्यायालयाने खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले.

तक्रारदारांची प्रतिक्रिया

तक्रारदार अनिल भांगरे यांनी सांगितले, “आम्ही सन २०२१ पासून या प्रकरणाचा पाठपुरावा करत होतो. अनेक अडथळे आले, पण अखेर न्यायालयाने खटला सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे आमचा न्यायावर विश्वास अधिक बळकट झाला आहे.”

प्रतिनिधी गणेश नामदेव भेगडे (मो. ९९२१८०७०११)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!