Homeराजकीयखळबळ जनक बातमी. खोट्या सहीचा घोटाळा! प्रभाग क्रमांक ७-अ मधील उमेदवारी ‘चोरून’...

खळबळ जनक बातमी. खोट्या सहीचा घोटाळा! प्रभाग क्रमांक ७-अ मधील उमेदवारी ‘चोरून’ मागे घेतल्याचा स्फोटक आरोप; वैशाली तांबोळी आक्रमक

तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 7 अ मध्ये संतापाची ठिणगी पडली आहे. वैध अर्जदार सौ. वैशाली बाळासाहेब तांबोळी यांची उमेदवारी त्या स्वतःने एक अक्षरही न लिहिता ‘मागे घेतली’ असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केल्याने आज प्रभागातील वातावरण अक्षरशः पेटले.

“मी अर्ज मागे घेतलाच नाही! मग माझ्या नावाने खोटी सही कोणाने केली?” असा थेट सवाल सौ वैशाली तांबोळी यांनी उपस्थित केला आहे. हा प्रकार निव्वळ चूक नसून, निवडणूक प्रक्रियेवर डल्ला मारण्याचा संगनमताचा खेळ असल्याचा त्यांचा आरोप आहे.

आज सकाळीच सौ. तांबोळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना धडक देणार असून,

“हा प्रकार नक्की कोणाच्या इशाऱ्यावर झाला? माझ्या अनुपस्थितीत, माझ्या संमतीशिवाय अर्ज मागे घेतल्याचे कसे जाहीर केले? खोटी सही कोणी केली?”

याबाबत लेखी खुलासा देण्याची मागणी त्या करणार आहेत.

याचबरोबर, हा गंभीर प्रकार थेट जिल्हाधिकारी व राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या निदर्शनास आणत सविस्तर लेखी तक्रार आजच दाखल करण्याची तयारी तांबोळी यांनी केली आहे.

“खोटी सही करून माझा निवडणुकीचा घटनादत्त हक्क हिरावून घेणाऱ्यांना मी सोडणार नाही,” असा इशारा देत तांबोळी यांनी आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणातील संबंधित अधिकारी आणि खोटी सही करणारे आरोपी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा व न्यायालयीन लढाई लढण्याचा त्यांचा निर्धार आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेत उघड झालेल्या या कथित गैरप्रकारामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून,

“लोकशाहीला गालबोट लावणारा हा प्रकार उघड झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही,” असे तांबोळी समर्थकांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!