Homeराजकीयतळेगावच्या राजकारणात भूचाल: भेगडे–शेळके एकत्र, महायुतीची घोषणा

तळेगावच्या राजकारणात भूचाल: भेगडे–शेळके एकत्र, महायुतीची घोषणा

तळेगाव दाभाडे : तळेगावच्या स्थानिक राजकारणात आज मोठा राजकीय भूकंप झाला आहे. दीर्घकाळ एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे भाजपाचे माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार सुनील शेळके अखेर एका मंचावर आले आहेत.

पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी एकमेकांना टाळी देत महायुतीवर अधिकृत शिक्कामोर्तब केले. त्यामुळे तळेगावच्या स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची निर्मिती झाली असून, आगामी निवडणुकांसाठी राजकीय रंगत अधिक चढली आहे.

या पत्रकार परिषदेत माजी मंत्री भेगडे आणि आमदार शेळके यांनी संयुक्तपणे नगरपरिषद निवडणुकीसाठी महायुतीची घोषणा केली. यावेळी त्यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषद नगराध्यक्षपदी संतोष दाभाडे (पाटील )तसेच गणेश काकडे यांना संधी देण्याची घोषणा केली.

या ऐतिहासिक एकत्रीकरणानंतर तळेगावच्या राजकारणात नवे सत्तासमीकरण निर्माण झाले आहे. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, स्थानिक पातळीवर या निर्णयाचे दूरगामी परिणाम दिसतील, अशी राजकीय वर्तुळातील प्रतिक्रिया आहे.

भेगडे–शेळके यांची ही एकजूट तळेगावातील राजकीय दिशा बदलणारी ठरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!