Homeराजकीयतळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत दोन दिवसांत ३६अर्ज दाखल होऊन राजकीय रणधुमाळीला सुरुवात

तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत दोन दिवसांत ३६अर्ज दाखल होऊन राजकीय रणधुमाळीला सुरुवात

तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत दोन दिवसांत ३६अर्ज दाखल होऊन राजकीय रणधुमाळीला सुरुवात

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीच्या नामांकन प्रक्रियेला अवघ्या दोन दिवसांत प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, शनिवारी आणि रविवारी मिळून तब्बल 36 अर्ज दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे या अर्जांपैकी तब्बल 12 अर्ज महिला उमेदवारांचे आहेत. महिलांची ही उत्स्फूर्त एन्ट्री स्थानिक राजकारणात नव्या उर्जेचा संचार करत असून, आगामी निवडणूक महिलांच्या नेतृत्वाला नवी दिशा देणार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. पहिल्या दिवशी अवघे 6 अर्ज दाखल झाले होते, मात्र दुसऱ्या दिवशी तब्बल 30 अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीची रंगत लक्षणीयपणे वाढल्याचे स्पष्ट झाले.

पक्षनिहाय आकडेवारीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) सर्वाधिक आघाडीवर राहिली असून त्यांनी तब्बल 18 अर्ज दाखल केले आहेत. भारतीय जनता पक्षाचे 9 अर्ज दाखल झाले असून अपक्ष उमेदवारांची संख्या देखील 9 आहे. काही उमेदवारांनी सर्वसाधारण आणि मागास प्रवर्ग या दोन्ही श्रेणींसाठी स्वतंत्र अर्ज दाखल केल्याचे दिसून आले. त्यामुळे छाननी प्रक्रियेनंतर कोण कोणत्या गटातून अंतिम स्पर्धेत उतरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नामांकन प्रक्रियेचा दुसरा दिवस पूर्णतः निवडणूक वातावरणात न्हाऊन निघाला होता. उमेदवारांनी आपापल्या समर्थकांसह स्टेशन परिसरातील हनुमान मंदिर आणि गावातील श्री डोळसनाथ महाराज मंदिरात दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात केली. ढोल-ताशांचा दणदणाट, घोषणाबाजी, कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे रॅलींना जल्लोषपूर्ण रूप प्राप्त झाले. संपूर्ण शहर निवडणुकीच्या उत्साहात रंगून गेले होते. रॅली नूतन प्रशासकीय इमारतीपर्यंत पोहोचताच उमेदवारांनी मोठ्या उत्साहात आपली नामनिर्देशन पत्रे दाखल केली.

या नामांकन प्रक्रियेला विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली. यामध्ये आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, शहराध्यक्ष सुरेश धोत्रे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता. या उपस्थितीमुळे दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये निवडणुकीची तयारी किती जोमात सुरू आहे याची प्रचिती येत होती.

नामांकन प्रक्रियेत महिलांचा विशेष उत्साह जाणवत होता. स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी दाखवणाऱ्या अनेक महिलांनी दाखल केलेल्या अर्जांमुळे या निवडणुकीत महिलांचे नेतृत्व अधिक ठळकपणे दिसून येणार आहे. समाजातील विविध स्तरांमधून राजकारणात महिलांची सातत्याने वाढती भागीदारी तळेगावच्या स्थानिक स्वराज्य संस्थेलाही नवे रूप देणार असल्याचे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

पुढील काही दिवसांत अर्जांची छाननी, अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आणि त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. वाढत्या अर्जसंख्येमुळे आणि दोन्ही प्रमुख पक्षांतील सुरू असलेल्या हालचालींमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून, राजकीय समीकरणे कोणत्या दिशेने बदलतील, हे पाहणे तळेगावकरांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!