तळेगाव दाभाडे येथील सहा दुकानांवर बनावट कपडे विक्री प्रकरणी कारवाई करण्यात आली
तळेगाव दाभाडे : नामांकित अशा पुमा कंपनीच्या नावाने बनावट कपडे विक्री करणाऱ्या तळेगाव दाभाडे शहरातील ब्रँड हब चे मालक अमर शाम चव्हाण(वय २९ तळेगाव दाभाडे) छत्रपती मेन्स अटायर चे मालक प्रसाद नवनाथ कुल ( वय २९ तळेगाव दाभाडे) HP क्लोथ स्टोर चे मालक हितेश उदयसिंग परदेशी( वय ३२ तळेगाव दाभाडे) आउट लुक मेन्स वेअर चे मालक सौरव रोहिदास उबाळे(वय २५ इंदोरी मावळ) जयश्री एन एस चे मालक हरेश मोतीराम देवासी(वय २५ तळेगाव दाभाडे) लिमिटेड एशियन व सेकंड स्क्रीन चे मालक शशांक दीपक जैन(वय ३० तळेगाव दाभाडे) या सहा दुकानदारावर पोलिसांनी कॉपीराईट कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
सदरील दुकानदारांनी बनावट कपड्यांना पुमा या नामांकित कंपनीचे नाव व लोगो वापरून त्यांची विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला. गुरुवार दिनांक २२ मे २०२५ रोजी दुपार च्या वेळेत ही कारवाई करण्यात आली. या सर्व सहा दुकान मालकांवर कॉपीराईट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीच्या नावाने बनावट कपडे विक्री होत आहे अशी माहिती पुमा कंपनीचे फिल्ड ऑफिसर महेंद्र साहिन सिंग (वय ३६) यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तळेगाव स्टेशन येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील काही दुकानदार बनावट कपडे विक्री करत असल्याची माहिती पुमा कंपनीचे फिल्ड ऑफिसर महेंद्रसिंग यांना मिळाली होती. महेंद्रसिंग यांनी सदरील दुकानात जाऊन खात्री केली असता पुमा कंपनीचे नाव आणि लोगो वापरून बनावट कपड्यांची विक्री केली जात होती.
महेंद्रसिंग यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांना माहिती देऊन वरील सर्व सहा दुकानांवर कारवाई केली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहे.
प्रतिनिधी :गणेश नामदेव भेगडे




















