देवराई संस्था मावळ व रघुनाथ ढोले देवराई संस्था थेऊर यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव येथे वृक्ष बिजरोपण प्रकल्प
तळेगाव दाभाडे : येथील स्टेशन परिसरात असणाऱ्या हरणेश्वर टेकडीवर देवराई संस्था मावळ व रघुनाथ ढोले देवराई संस्था थेऊर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक २७मे २०२५ रोजी सकाळी ८: वाजता हरणेश्वर टेकडीवर देशी बीज रोपण प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले असून देवराई संस्थेने सुमारे ७००० हजार पळस, रानपांगार, खैर, पिंपळ, हिवर, करप, वड, इत्यादी २० प्रकारच्या वृक्षांच्या बिया उपलब्ध केलेल्या आहेत.
तरी सर्व वृक्षप्रेमी, पर्यावरण प्रेमी नागरिकांनी आंबा, जांभूळ, फणस, आदी देशी वृक्षांच्या बिया घेऊन याव्यात तसेच खुरपे व सुमारे दोन लिटर पाणी घेऊन उपस्थित राहावे उपस्थित नागरिकांच्या हस्ते हरणेश्वर टेकडीवर विविध वृक्षांच्या बिया जमिनीत लागवड केल्या जाणार आहेत.
तरी जास्तीत जास्त वृक्षप्रेमी नागरिक व पर्यावरण प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवराई संस्था मावळ व तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गिरीष(तात्या)खेर यांनी केले आहे.
प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















