
नगराध्यक्ष पदासाठी 1 तर नगरसेवक पदासाठी 13 अर्ज; आतापर्यंत एकूण 19 अर्ज दाखल
वडगाव, दि. 16 नोव्हेंबर : मा. राज्य निवडणूक आयोगाने दि. 04 नोव्हेंबर 2025 रोजी वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर नामनिर्देशन अर्ज दाखल प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार आज दि. 16 नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदाकरिता 1 आणि नगरसेवक पदाकरिता 13 असे एकूण 14 नामनिर्देशनपत्र दाखल झाली. यामुळे दोन दिवसांत एकूण 19 अर्ज नगरपंचायत कार्यालयात प्राप्त झाले आहेत.


आज प्राप्त नामनिर्देशन अर्ज
नगराध्यक्ष पद मृणाल गुलाबराव म्हाळसकर
नगरसेवक पद (प्रभागनिहाय)
प्रभाग क्र. 1: मिरा चंद्रकांत पारधी
प्रभाग क्र. 4: पूजा अतिश ढोरे
प्रभाग क्र. 5: रूपाली अतुल ढोरे
प्रभाग क्र. 8: माया अमर चव्हाण, पुनम नितीन म्हाळसकर
प्रभाग क्र. 9: सारिका प्रशांत चव्हाण
प्रभाग क्र. 11: सुनील गणेश ढोरे
प्रभाग क्र. 12: राजेंद्र हनुमंत म्हाळसकर, अतुल खंडू वायकर
प्रभाग क्र. 16: लीला सतीश म्हाळसकर, राणी संतोष म्हाळसकर
प्रभाग क्र. 17: अर्चना संतोष म्हाळसकर


मतदानासाठी 180 अधिकारी-कर्मचारी नियुक्त
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव नगरपंचायतीने प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर कामकाज करण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान केंद्र अधिकारी व कर्मचारी मिळून एकूण 180 अधिकारी-कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे.
या संपूर्ण प्रक्रियेचे मार्गदर्शन मा. सौ. मनिषा तेलभाते (निवडणूक निर्णय अधिकारी) व डॉ. प्रविण निकम (सहा. निवडणूक निर्णय अधिकारी) यांनी केले.
मतदान कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण सत्र
नगरपंचायत सभागृहात आज मतदान प्रक्रियेबाबत सविस्तर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या सत्रात खालील मुद्द्यांवर मार्गदर्शन देण्यात आले —
मतदान केंद्रावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांची कर्तव्ये
मतदान केंद्राध्यक्ष, क्षत्रिय अधिकारी आणि इतर कर्मचार्यांना प्रत्यक्ष कामकाजाची माहिती देण्यात आली.


EVM, VVPAT, CU, BU हाताळणीचे प्रात्यक्षिक
मतदान यंत्रांचे कार्य, सीलिंग-अनसीलिंग, मॉक पोल प्रक्रिया याचे प्रत्यक्ष डेमो देण्यात आले.
मतदानदरम्यान उद्भवणाऱ्या समस्या आणि उपाययोजना
मतदारांची ओळख, तांत्रिक अडचणी, तक्रारी व त्यांची नोंद याबाबत मार्गदर्शन झाले.
मतदान समाप्तीनंतरची प्रक्रिया
यंत्र जमा करणे, दस्तऐवज तयार करणे, केंद्र सील करणे इत्यादी महत्वाच्या कामांचे विवरण समजावून सांगण्यात आले.
प्रशिक्षणास सर्व नियुक्त अधिकारी व कर्मचारी पूर्ण उपस्थित होते.



















