पर्यावरण दिनानिमित्त वडगांव नागपंचायत मार्फत वृक्षारोपण व जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचा अंत जनजागृती
वडगांव मावळ : वडगाव नगरपंचायत तर्फे जागतिक पर्यावरण दिननिमित्त माझी वसुंधरा 6.0 अंतर्गत शहरातील ओपन स्पेस असलेल्या ठिकाणच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. यावेळी नगरपंचायचे मुख्याधिकारी, सर्व विभाग प्रमुख तसेच सर्व अधिकारी/कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
यावर्षी नगरपंचायतचे 25000 देशी प्रजातीचे वृक्षारोपण करण्याचे उद्धीष्ट आहे यावेळी सर्वांना पर्यावरणातील होणारे बदल, वाढते प्रदूषण यांना आळा घालण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावण्याबाबत प्रेरित करण्यात आले. तसेच वसुंधरेला वाचविण्यासाठी एकल प्लास्टिक वापर करू नये, जास्तीत जास्त झाडे लावावे, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करणे, विजेची व पाण्याची बचत करणे, शक्य होत असेल तर घरीच कंपोस्ट तयार करून त्याचा वापर करणे, सौरपॅनेल/सौरहिटर चा वापर करणे बाबत जनजागृती करण्यात आली.
जागतिक पर्यावरण दिन हा पर्यावरणाच्या रक्षण व संवर्धनासाठी सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय दिवस आहे. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) च्या नेतृत्वाखाली आणि १९७३ पासून दरवर्षी ५ जून रोजी आयोजित केला जाणारा हा दिवस पर्यावरणीय प्रचारासाठी सर्वात मोठा जागतिक व्यासपीठ बनला आहे.
जगभरातील लाखो लोक हा दिवस साजरा करतात तसेच नागरिकांनमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण व्हावी, यासाठी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो
स्वच्छ वडगांव सुंदर वडगांव हरित वडगांव
वृक्षवल्ली अन्य कोणी नसून आपलेच सोयरे म्हणजे नातेवाईक आहेत, ही जाणीव आमच्या संतांनी, संस्कृतीने फार आधीपासूनच आमच्या मनात खोलवर रुजवली आहेत. म्हणूनच तुळशीची पूजा, शंकराला बेल, वडाला प्रदक्षिणा, मंगलकार्यात केळीचे खांब, जेवणानंतर गोविंदविडा इ. वृक्षवल्ली अर्थात पर्यावरणाशी निगडित गोष्टी आपल्या आयुष्याच्या अविभाज्य भाग बनल्या आहेत.




















