Homeमहत्त्वाचेपै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्था व भाजपा किसान मोर्चा यांच्या वतीने...

पै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्था व भाजपा किसान मोर्चा यांच्या वतीने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी चाऱ्याची व जीवनावश्यक वस्तूंची व्यवस्था

पै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्था व भाजपा किसान मोर्चा यांच्या वतीने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी चाऱ्याची व जीवनावश्यक वस्तूंची व्यवस्था

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील सामाजिक कार्य आणि शेतकरीहितासाठी नेहमीच तत्पर असलेल्या पै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्था आणि भाजपा किसान मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव, भूम, परंडा परिसरातील पूरग्रस्त शेतकरी बांधवांच्या पशुधनासाठी सुक्या चाऱ्याची मोठ्या प्रमाणावर व्यवस्था करण्यात आली.

Oplus_16908288

गुरुवार, दिनांक २ ऑक्टोबर रोजी तळेगाव दाभाडे येथून तब्बल ८ ट्रक चारा पूरग्रस्त भागाकडे रवाना करण्यात आला. त्याचबरोबर शेतकरी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही करण्यात आले. या मदतीमुळे पूरामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, स्थानिक किसान मोर्चा पदाधिकारी व शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.

या उपक्रमाच्या प्रस्थानावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश किसनराव भेगडे, पतसंस्थेचे शरद शेलार, अजय भेगडे, दीपक भेगडे, राजेंद्र बुट्टे (पाटील), सुनील बबनराव भेगडे, अजय नथुराम भेगडे, भाजपा नेते रवींद्र अण्णासाहेब भेगडे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे म्हणाले : “पूरग्रस्त शेतकरी बांधवांना मदत करणे ही आपली जबाबदारी आहे. किसान मोर्चा व पतसंस्थेच्या माध्यमातून आज चारा व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले असून, पुढील काळातही अशाच पद्धतीने मोफत चाऱ्याची व्यवस्था सातत्याने केली जाणार आहे. शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा, हाच आमचा उद्देश आहे.”

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मावळ तालुक्यातील सामाजिक व राजकीय संस्थांनी पुढाकार घेतल्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे.

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे मो. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!