Homeराजकीयमावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व उमेदवार...

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व उमेदवार जाहीर

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व उमेदवार जाहीर

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक तयारीचा वेग वाढवत सोमवारी सायंकाळी आपल्या सर्व उमेदवारांची अधिकृत घोषणा केली. तळेगाव दाभाडे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत तालुक्यातील सर्व गट व गणांतील उमेदवार जाहीर करण्यात आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले असून निवडणूक लढतीचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत.

सोमवार, दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजता मावळ तालुकाध्यक्ष गणेश वसंतराव खांडगे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार सुनील शेळके, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, माजी तालुकाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे, रामनाथ वारंगे, किशोर सातकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलताना गणेश खांडगे यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुक्यात विकासकेंद्री धोरण, लोकांचा विश्वास आणि संघटनेच्या ताकदीवर निवडणुकीला सामोरे जाणार आहे. “पक्षाने जाहीर केलेली उमेदवार यादी ही तळागाळातील कार्यकर्ते, महिलांना प्रतिनिधित्व देणारी आणि नव्या नेतृत्वाला संधी देणारी आहे. गावागावातील मूलभूत प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार यावर भर देत मावळचा सर्वांगीण विकास साधणे हेच आमचे उद्दिष्ट आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषदेसाठी टाकवे बुद्रुक–नाणे गटातून अनंता हनुमंत पावसे, वराळे–इंदोरी गटातून पल्लवी दाभाडे, खडकाळे–कार्ला गटातून दिपाली हुलावळे, कुसगाव बुद्रुक–काले गटातून संतोष गबळु राऊत, तर सोमाटणे–चांदखेड गटातून मनीषा मुर्हे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महिला उमेदवारांचा सहभाग लक्षणीय असून अनुभव आणि नव्या चेहऱ्यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न पक्षाने केल्याचे दिसून येते.

पंचायत समितीसाठी टाकवे बुद्रुक गणातून प्राची देवाभाऊ गायकवाड, नाणे गणातून आशा ज्ञानेश्वर मोरमारे, इंदोरी गणातून दिलीप नामदेव ढोरे, कार्ला गणातून रेशमा राजू देवकर, कुसगाव बुद्रुक गणातून योगेश मुरलीधर लोहार, काले गणातून शिला रामचंद्र कालेकर, सोमाटणे गणातून साहेबराव कारके, चांदखेड गणातून सुनिता मनोज येवले यांना संधी देण्यात आली आहे. खडकाळे गणातून राष्ट्रवादी काँग्रेस–आरपीआय युतीकडून समीर खंडू जाधव, तर वराळे गटातून अतुल मराठे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली.

आमदार सुनील शेळके यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे विकासाची खात्री आहे. ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आहे.” उमेदवार जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून प्रचारयंत्रणा सक्रिय झाल्याचे चित्र आहे.

आगामी निवडणुकीत मावळ तालुक्याची सत्ता कोणाच्या हाती जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेली ही उमेदवार यादी निवडणूक लढतीत रंगत वाढवणारी ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती; नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन वडगाव मावळ दि. २७ : आगामी...

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू कान्हे फाटा येथे कंटेनरची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ वडगाव मावळ दि. २७ : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात...

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल वडगाव मावळ, दि. 24 : जनगणना 2027 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शासकीय प्रगणकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतरही...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी वडगाव मावळ, दि. १९ : येथील रयत शिक्षण संस्था संचालित...

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

error: Content is protected !!