Homeसामाजिकवडगाव मावळात शिक्षणासाठी पुढाकार – उपनगराध्यक्ष सुनिलभाऊ ढोरे यांची न्यू इंग्लिश स्कूलला...

वडगाव मावळात शिक्षणासाठी पुढाकार – उपनगराध्यक्ष सुनिलभाऊ ढोरे यांची न्यू इंग्लिश स्कूलला मदतीचा हात

वडगाव मावळ दिनांक : २१ एप्रिल २०२६ येथील न्यू इंग्लिश स्कूलला उपनगराध्यक्ष सुनिलभाऊ ढोरे यांनी दिलेल्या भेटीत शाळेच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत विद्यार्थ्यांसाठी तत्काळ मदतीचा हात पुढे केला. या भेटीदरम्यान शाळेचे मुख्याध्यापक श्री. हाके सर यांनी शाळेसमोरील विविध अडचणींबाबत सविस्तर माहिती दिली.

मुख्याध्यापकांनी मांडलेल्या समस्यांची दखल घेत उपनगराध्यक्ष ढोरे यांनी तात्काळ शाळेसाठी पाच संगणक संच उपलब्ध करून दिले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची सुविधा मिळणार आहे. तसेच, मुला-मुलींसाठी स्वतंत्र डिजिटल टॉयलेटची सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी आश्वासन दिले.

शाळेत पाण्याच्या समस्येबाबतही त्यांनी तत्परता दाखवत नगरपंचायत कर्मचाऱ्यांना तातडीने सूचना दिल्या. संबंधित कर्मचाऱ्यांनी लगेचच काम हाती घेऊन पाण्याचा प्रश्न सोडवला, त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

यावेळी उपनगराध्यक्ष ढोरे यांनी भविष्यातही शाळेसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत, “विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ देणार नाही,” असे स्पष्ट केले.

या सर्व कामांबद्दल मुख्याध्यापक हाके सर, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करत उपनगराध्यक्ष सुनिलभाऊ ढोरे यांचा शाळेच्या वतीने सन्मान केला.

कार्यक्रमाच्या शेवटी उपनगराध्यक्ष ढोरे यांनी विद्यालयाच्या विकासासाठी सहकार्य करणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती; नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन वडगाव मावळ दि. २७ : आगामी...

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू कान्हे फाटा येथे कंटेनरची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ वडगाव मावळ दि. २७ : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात...

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल वडगाव मावळ, दि. 24 : जनगणना 2027 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शासकीय प्रगणकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतरही...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी वडगाव मावळ, दि. १९ : येथील रयत शिक्षण संस्था संचालित...

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

error: Content is protected !!