Homeमहत्त्वाचेवडगाव शहरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा सशस्त्र...

वडगाव शहरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा सशस्त्र रूट मार्च

वडगाव शहरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा सशस्त्र रूट मार्च

वडगाव मावळ : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि विविध सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर वडगाव मावळ शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ करण्यासाठी वडगाव मावळ पोलिस स्टेशन आणि केंद्रीय सशस्त्र दल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सशस्त्र रूट मार्च काढण्यात आला.

पोलिस निरीक्षक कुमार कदम यांची माहिती

या उपक्रमाबाबत बोलताना पोलीस निरीक्षक कुमार कदम म्हणाले, “आगामी निवडणुका व धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखणे हे आमचे पहिले उद्दिष्ट आहे. संभाव्य गोंधळ अथवा आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत.”

रूट मार्चमध्ये मोठ्या संख्येने जवान सहभागी

या रूट मार्चमध्ये नवी मुंबई येथील रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) बटालियन, वडगाव मावळ पोलिस अधिकारी व कर्मचारी मिळून सुमारे ५० सशस्त्र जवान सहभागी झाले.

३ पोलीस अधिकारी,

२ RAF अधिकारी,

२ वरिष्ठ अधिकारी,

१८ पोलीस अमलदार,

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) २५ जवान

अशी मोठी फौज या संचलनात सहभागी झाली होती.

शहरातील प्रमुख ठिकाणांतून संचलन

सदरचा रूट मार्च शहरातील महत्त्वाच्या व गर्दीच्या भागांतून काढण्यात आला. यात तहसील कार्यालय, पंचायत समिती चौक, न्यायालय, श्री पोटोबा मंदिर, जामा मस्जिद, चावडी चौक या ठिकाणांचा समावेश होता. याशिवाय बाजारपेठ, ढोरे वाडा, मिलिंद नगर, कुढे वाडा या भागांतूनही सशस्त्र जवानांनी संचलन केले.

उद्दिष्ट – नागरिकांचा विश्वास वाढवणे

या रूट मार्चचा हेतू म्हणजे निवडणुका व सण-उत्सवांदरम्यान नागरिकांना सुरक्षिततेचा विश्वास देणे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस दल सदैव तत्पर असल्याचा संदेश देणे हा होता. तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या वडगाव मावळात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा कक्ष असल्याने पोलिस प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. वडगाव शहरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा सशस्त्र रूट मार्च

प्रतिनिधी गणेश नामदेव भेगडे (मो. ९९२१८०७०११)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!