Homeमहत्त्वाचेसयाजी शिंदे यांच्या पुढाकारातून मावळात देशी वृक्षलागवडीचा उपक्रम; आमदार सुनील शेळके यांच्या...

सयाजी शिंदे यांच्या पुढाकारातून मावळात देशी वृक्षलागवडीचा उपक्रम; आमदार सुनील शेळके यांच्या निवासस्थानी बैठक

तळेगाव दाभाडे : २ जून  सुप्रसिद्ध अभिनेते आणि ‘सह्याद्री देवराई’ संस्थापक सयाजी शिंदे (दादा) यांच्या पुढाकारातून आणि मार्गदर्शनाखाली मावळ तालुक्यात जैवविविधतेसाठी देशी वृक्षलागवडीचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या तयारीसाठी आमदार सुनील शेळके यांच्या निवासस्थानी सोमवारी विशेष बैठक पार पडली.

या बैठकीला सयाजी शिंदे यांच्यासह मावळ तालुक्यातील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सोमटणे, गहुंजे, इंदोरी, टाकवे बुद्रुक आणि अन्य वनक्षेत्रांमध्ये सह्याद्री देवराईच्या सहकार्याने स्थानिक देशी वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पावसाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर हा काळ वृक्षारोपणासाठी अतिशय अनुकूल मानला जातो. नैसर्गिक पाणी उपलब्ध असल्याने नवीन रोपे लवकर रुजतात आणि परिसरातील वनस्पती व प्राण्यांची जैवविविधता वाढीस लागते. यामुळे ऑक्सिजन निर्मितीत वाढ होईल आणि वन्यजीवांचे संवर्धन होण्यास हातभार लागेल.

या उपक्रमातून पर्यावरण रक्षण, हरित महाराष्ट्र आणि शाश्वत विकास यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे. या संपूर्ण मोहिमेबाबत आमदार शेळके म्हणाले, “पर्यावरणाविषयीची आपली संवेदनशीलता लक्षात घेता, हा उपक्रम मावळच्या निसर्गसौंदर्यात भर घालणारा ठरेल, याचा मला अभिमान आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!