Homeमहत्त्वाचेसुशिक्षितांची अस्वच्छता! नाना भालेराव कॉलनीत कचऱ्याचा कळस

सुशिक्षितांची अस्वच्छता! नाना भालेराव कॉलनीत कचऱ्याचा कळस

तळेगाव दाभाडे:स्टेशन परिसरातील नाना भालेराव कॉलनी सध्या कचऱ्याच्या गंभीर समस्येने त्रस्त झाली आहे. कॉलनीतील काही नागरिकांकडून दररोज रस्त्याच्या कडेला सर्रास कचरा टाकला जात असल्याने परिसराचे विद्रूपीकरण झाले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

रस्त्यावर टाकलेला कचरा भटके कुत्रे संपूर्ण कॉलनीत पसरवत असल्यामुळे दुर्गंधी वाढली असून संसर्गजन्य आजारांचा धोका देखील वाढत आहे. विशेष म्हणजे, कचरा टाकणाऱ्यांमध्ये उच्च शिक्षित नागरिक, वैद्यकीय शिक्षण घेणारे तसेच सुशिक्षित व्यक्तींचा समावेश असल्याने ही बाब अधिकच धक्कादायक ठरत आहे.

कॉलनीमध्ये दररोज सकाळी नियमितपणे घंटागाडी येत असतानाही काही नागरिक जाणीवपूर्वक कचरा घंटागाडीत न टाकता थेट रस्त्यावर फेकत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्वच्छतेबाबत नागरिकांची उदासीनता स्पष्टपणे दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर कॉलनीतील ज्येष्ठ नागरिकांनी संबंधित ठिकाणी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, क्लीन मार्शलची नियुक्ती करावी तसेच कचरा टाकणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करावी, अशी ठाम मागणी प्रशासनाकडे केली आहे. प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!