अखंड मराठा समाज मावळ तालुक्याच्या वतीने “गुणवंतांचा सन्मान सोहळा”
वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व गुणवंतांचा सन्मान करण्याचा उपक्रम अखण्ड मराठा समाज मावळ तालुका यांच्या वतीने हाती घेण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत “गुणवंतांचा सन्मान सोहळा” हा कार्यक्रम रविवार दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वा. आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाचे ठिकाण राजमुद्रा हॉल, राजमुद्रा फूड जंक्शन, जुन्या मुंबई-पुणे हायवे, वडगाव मावळ असे आहे.
या कार्यक्रमात मावळ तालुक्यातील विविध स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक क्षेत्र, क्रीडा, कला, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे. समाजातील तरुणाईला प्रेरणा देणाऱ्या आणि समाजाभिमुख कार्य करणाऱ्या व्यक्तींनाही विशेष सन्मानाने गौरवण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
अखंड मराठा समाज मावळ तालुक्याच्या वतीने हा पहिलाच उपक्रम आयोजित करण्यात येत असून, समाजातील ऐक्य, परस्पर सहकार्य आणि प्रेरणादायी कार्याचा सन्मान करण्याचा हा उपक्रम ठरणार आहे.
कार्यक्रमास मान्यवर पदाधिकारी, समाजसेवक, शिक्षणतज्ञ, उद्योगपती व नागरिकांची उपस्थिती अपेक्षित आहे.
या सोहळ्याचे आयोजन अखंड मराठा समाज मावळ तालुका यांच्या वतीने करण्यात आले असून, कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट “एक मराठा लाख मराठा” या घोषवाक्याशी सुसंगतपणे समाजातील गुणी व्यक्तींना प्रोत्साहन देणे आहे.



















