Homeमहत्त्वाचेआमदार शेळके यांच्या सूचनेनंतर ठाकर वस्तीपर्यंत प्रथमच पोहचले तहसीलदार आणि बीडीओ

आमदार शेळके यांच्या सूचनेनंतर ठाकर वस्तीपर्यंत प्रथमच पोहचले तहसीलदार आणि बीडीओ

तळेगाव दाभाडे : २९ मे – तळेगाव दाभाडे शहर आणि सोमाटणे ग्रामपंचायत यांच्या मध्ये वसलेली ठाकर वस्ती ही प्रशासकीय दृष्ट्या त्रिशंकू स्थितीत असल्यामुळे आजपर्यंत दुर्लक्षित राहिली होती. मात्र, मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सूचनेनुसार आज या वस्तीला तालुका प्रशासनाने पहिल्यांदाच भेट दिली.

या दौऱ्यात तहसीलदार विक्रम देशमुख आणि गटविकास अधिकारी (बीडीओ) कुलदीप प्रधान यांनी ठाकर वस्तीतील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यावर उपाययोजना सुचवल्या. घरकुल योजना, संजय गांधी निराधार योजना, रेशनकार्ड, जात प्रमाणपत्र आदी विविध शासकीय योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

वस्तीतील नागरिकांचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिले होते. प्रशासनाचा हा दौरा ठाकर वस्तीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात असून, प्रत्यक्ष संवादातून विकासाचा मार्ग मोकळा होण्यास मदत होईल, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला.

दौर्‍यावेळी ग्रामसेवक खोमणे, आमदार कार्यालयाचे प्रतिनिधी सचिन वामन, शाम शेळके, अनिल जाधव, अशोक गावडे, अश्विन केदारी, राहुल जाधव, सुरेश केदारी, राजू गावडे आदी उपस्थित होते. स्थानिक महिला व ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

हा दौरा ठाकर वस्तीच्या सर्वांगीण विकासासाठी एक सकारात्मक पाऊल ठरले असून, प्रशासन व जनप्रतिनिधींमधील समन्वयाचे प्रत्यक्ष उदाहरण यातून दिसून आले आहे.

आरोग्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रथमत आरोग्य शिबिर नंतर जात प्रमाणपत्र संजय गांधी योजनेचे कॅम्प या वस्तीवर सुरू करू . शासनाच्या विविध योजना राबवण्यासाठी सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा विक्रम देशमुख- तहसिलदार मावळ

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!