Homeउद्योगआमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत तळेगाव दाभाडे इंडस्ट्रियल असोसिएशनची महत्त्वपूर्ण बैठक

आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत तळेगाव दाभाडे इंडस्ट्रियल असोसिएशनची महत्त्वपूर्ण बैठक

आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत तळेगाव दाभाडे इंडस्ट्रियल असोसिएशनची महत्त्वपूर्ण बैठक

नवलाख उंब्रे : तळेगाव दाभाडे इंडस्ट्रियल असोसिएशनची महत्त्वपूर्ण बैठक आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत उद्योग क्षेत्राचा विकास, रस्ते, वाहतूक, वीजपुरवठा तसेच स्थानिक कामगारांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

बैठकीत आमदार शेळके यांनी चाकण–शिंदे वसुली व शिंदे वसुली–पॉवर हाऊस मार्गावरील प्रलंबित रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित विभागांना दिल्या. या निर्णयामुळे औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

कामगारांच्या सोयीसाठी पीएमपीएमएल बस सेवा शिंदे वसुलीपर्यंत वाढविण्याचा ठोस निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या भागात काम करणाऱ्या हजारो कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच अपघात टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ७० ते ८० ट्रॅफिक वॉर्डन नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय हुंदाई कंपनीलगत सेवा रस्त्याचे रुंदीकरण व इतर प्रलंबित रस्त्यांची कामे तातडीने सुरू करण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली.

औद्योगिक क्षेत्रातील सर्वात गंभीर समस्या ठरलेल्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या मुद्द्यावरही आमदार शेळके यांनी ठोस भूमिका घेतली. वीजपुरवठा वारंवार खंडित झाल्यामुळे उत्पादनावर होणारा परिणाम उद्योग क्षेत्राच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केला.

बैठकीत उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सीएसआर फंडातून मावळ तालुक्यातील सामाजिक विकासकामांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावर आमदार शेळके यांनी सीएसआर निधी स्थानिक विकासासाठी वापरण्याची मागणी ठामपणे मांडली.

या बैठकीत घेतलेले निर्णय उद्योग क्षेत्राचा विकास, वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा, वीजपुरवठा आणि स्थानिक समाजाच्या सोयीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.

बैठकीस तळेगाव दाभाडे इंडस्ट्रियल असोसिएशनच्या अध्यक्षा श्रीमती अनु सेठी, उपाध्यक्ष जगदीश यादव, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यांच्यासह एफ ई व्हि इंडिया, एल अँड टी डिफेन्स, इनसेन प्रायव्हेट लिमिटेड, हुसको हायड्रोलिक, एॅटलास कोपको, ओगनिबेनी इंडिया लिमिटेड, पोस्को आयपीसी प्रायव्हेट लिमिटेड, चिकात्सो इंडिया, शेक्लर इंडिया, के एस एस प्रायव्हेट लिमिटेड, ए एम लाब्ररिग, बोर्गनॅर इंडिया, व्हिटेस्को टेक्नॉलॉजी, एस एच पिटकर, विनो २ एफ ठी आदी नामांकित कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती; नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन वडगाव मावळ दि. २७ : आगामी...

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू कान्हे फाटा येथे कंटेनरची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ वडगाव मावळ दि. २७ : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात...

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल वडगाव मावळ, दि. 24 : जनगणना 2027 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शासकीय प्रगणकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतरही...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी वडगाव मावळ, दि. १९ : येथील रयत शिक्षण संस्था संचालित...

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

error: Content is protected !!