Homeक्राईमकामशेत खिंडीत व्यावसायिकाला मारहाण करून लूट – चार अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

कामशेत खिंडीत व्यावसायिकाला मारहाण करून लूट – चार अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

कामशेत (ता. मावळ) दि. ११ सप्टेंबर

मावळ तालुक्यातील कामशेत खिंडीत व्यावसायिकाला अडवून मारहाण करत लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चार अनोळखी इसमांविरुद्ध कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भालचंद्र लहू काटावडे (वय ४२, रा. अजिवली, मावळ) असे लुटीचा बळी ठरलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार दिनांक ९ सप्टेंबर रोजी रात्री काटावडे हे त्यांच्या दुचाकीवरून कामशेत खिंडीतून जात होते. त्यावेळी चार अनोळखी इसमांनी त्यांना खिंडीत अडविले. त्यांनी अचानक मारहाण सुरू केली व त्यांच्या जवळील मोबाईल फोन, रोकड रक्कम तसेच दुचाकी असा एकूण ₹१,०२,००० किमतीचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

या प्रकरणी काटावडे यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, चौघा अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

कामशेत खिंड परिसरात अशा प्रकारच्या लुटमारीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, पोलीस पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपींना तात्काळ गजाआड करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे (मो. ९९२१८०७०११)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!