Homeराजकीयकार्यकर्ते हेच आमचे खरे बलस्थान; पुढील प्रत्येक निर्णय त्यांच्या सल्ल्यानेच – आमदार...

कार्यकर्ते हेच आमचे खरे बलस्थान; पुढील प्रत्येक निर्णय त्यांच्या सल्ल्यानेच – आमदार सुनील शेळके

कार्यकर्ते हेच आमचे खरे बलस्थान; पुढील प्रत्येक निर्णय त्यांच्या सल्ल्यानेच – आमदार सुनील शेळके

वडगाव मावळ : 23 जून – “मी आमदार आहे, कारण तुम्ही माझ्या मागे उभे राहिलात. आज निर्णय घ्यायचे असतील, तर तोही तुमच्या सल्ल्यानेच घ्यायचा,” असे स्पष्ट शब्दांत सांगत आमदार सुनील शेळके यांनी पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी कार्यकर्त्यांना केंद्रस्थानी ठेवण्याची भूमिका मांडली.

वडगाव मावळ येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळ तालुकास्तरीय पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात पक्ष संघटनेच्या सुदृढ बांधणीसाठी नवे संकेत दिले गेले. आमदार सुनील शेळके यांच्या सडेतोड भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. पक्षातील निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता, २० सदस्यीय समितीचा निर्णायक हस्तक्षेप, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आवाहन यामुळे हा मेळावा यशस्वी ठरला.

मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, गणेश आप्पा ढोरे, सुरेश चौधरी, विठ्ठल आण्णा शिंदे, महादू कालेकर, काळूराम मालपोटे, दीपक हुलावळे, कृष्णा कारके, नारायण पाळेकर, तुकाराम आसवले, भरत येवले, सुहास गरुड, लक्ष्मण बालगुडे, नामदेव ठुले, प्रवीण झेंडे, विलास बडेकर, सुरेश धोत्रे, अशोक भेगडे, दर्शन खांडगे, साहेबराव कारके, संदीप आंद्रे, भरत भोते, जीवन गायकवाड, किशोर सातकर, रुपेश घोजगे, मारुती देशमुख, पंढरीनाथ ढोरे, बाबूलाल नालबंद, प्रकाश हगवणे, कांतीलाल काळोखे, भरत लिम्हण, प्रवीण ढोरे, सुवर्णताई राऊत शोभाताई कदम, पूजाताई दिवटे, कल्याणीताई काजळे,शबनम खान, तेजस्विनी गरुड, सुनीता कुडे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संघटनात्मक आढावा व नियोजन

या बैठकीत आतापर्यंतच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मैदानी पातळीवर कार्यकर्त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यावर ठोस उपाय सुचविण्यात आले. संघटनात्मक बळकटी, कार्यपद्धतीतील सुधारणा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचे नियोजन या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.

सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणासाठी एकजुटीने अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

शेळके यांचे ठाम विधान – “नेतृत्व नव्हे, निर्णय आता कार्यकर्त्यांचे”

आमदार शेळके यांनी पक्षातील महत्त्वपूर्ण निर्णय प्रक्रियेसाठी २० जणांची समिती नियुक्त केली असून, “या समितीचा निर्णय मला देखील बंधनकारक असेल,” अशी ऐतिहासिक भूमिका घेतली. त्यांनी स्पष्ट केले की गाव अध्यक्ष, उमेदवार निवड, निधी मंजुरी यासारख्या सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांचा आवाज निर्णायक असेल.

भाजपवर टीका करत ते म्हणाले  “पूर्वी म्हणायचे – *तुम लढो, हम कपडे संभालेंगे*, आता म्हणतात – *तुम लढो, हम कॉन्ट्रॅक्ट संभालेंगे*… ही भूमिका आता सहन केली जाणार नाही.” त्यांनी भाजपमधील आपल्या ३० वर्षांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत, “भारतीय जनता पक्षात सामान्य कार्यकर्ता संपला आहे, पण राष्ट्रवादीत तो केंद्रस्थानी आहे,” अशी ठाम मांडणी केली.

नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती व संघटनात्मक विस्तार

या मेळाव्यात खालील पदाधिकाऱ्यांची नवीन नियुक्ती जाहीर करण्यात आली –

* *सौ. सुवर्णा राऊत* – महिला अध्यक्ष, मावळ तालुका

* *सौ. वर्षा नवघणे* – ग्रामीण महिला अध्यक्ष

* *श्री. सुरेश धोत्रे* – तळेगाव शहर अध्यक्ष

* *कु. सुशांत बालगुडे* – विद्यार्थी आघाडी अध्यक्ष

* *श्री. रवी पवार* – सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष

* *श्री. कुणाल आगळे* – सामाजिक न्याय विभाग, तळेगाव शहर

* *श्री. निलेश टाक* – सामाजिक न्याय विभाग, देहूरोड शहर

* *श्री. हरिश्चंद्र बगाड* – आदिवासी सेल अध्यक्ष, मावळ तालुका

संघर्षाला न्याय, संघटनेला बळ

शेवटी आमदार शेळके म्हणाले, “माझ्या अडचणीच्या काळात तुम्ही माझ्यासोबत होतात, आता मी तुमच्या मागे उभा आहे. कोणाला सरपंच करायचं, कोणाला नगरसेवक करायचं, हे सर्व निर्णय आता कार्यकर्त्यांच्या हाती आहेत. संघर्ष कमी करा, पण न्याय सर्वांना मिळालाच पाहिजे.”

या मेळाव्याने मावळमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीचे व राजकीय एकजुटीचे दर्शन घडवले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!