Homeमहत्त्वाचेकुंडमळा येथील इंद्रायणी नदी वरील लोखंडी पूल कोसळल्याने चार व्यक्तींचा मृत्यू झाला

कुंडमळा येथील इंद्रायणी नदी वरील लोखंडी पूल कोसळल्याने चार व्यक्तींचा मृत्यू झाला

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदी वरील लोखंडी पूल कोसळल्याची दुर्घटना रविवारी दिनांक १५ जून २०२५ रोजी दुपारी ३:३० च्या सुमारास घडली आहे. लोखंडी पूल हा आजुबाजूच्या दोन गावांना जोडणारा लोखंडी पूल असून हा लोखंडी पूल सुमारे ३० वर्ष जुना आहे.

यावेळी आमदार सुनील शेळके रात्रभर घटनास्थळी थांबून शासकीय अधिकारी कर्मचारी सामाजिक संस्था यांच्या समवेत समन्वय साधून बचाव कार्यात दिसून येत होते तसेच बचाव कार्यासाठी लागणारी मदत करत होते. आणि त्यानंतर रुग्णालयामध्ये जाऊन शेळके यांनी जखमी  झालेल्या पर्यटकांची विचार पूस केली.

रविवारी कुंडमळा या ठिकाणी अंदाजे १०० ते १२५  पर्यटक वर्षाविहारासाठी आले असता लोखंडी पुल कोसळून त्या खाली काही पर्यटक अडकले असल्याचे समजताच त्या ठिकाणी बचाव कार्यासाठी स्थानिक प्रशासन, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) चे 2 पथक, पिंपरी चिंचवड आयुक्तालय पोलीस यंत्रणा, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), आपदा मित्र, पुणे /पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (PMRDA) चे अग्निशमन दल, शिवदुर्ग संघटना, वन्यजीव संघटना यांचे मार्फत शोधकार्य सुरु केले होते.

रात्री उशीरापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेमध्ये एकूण ५१ व्यक्ती जखमी झाले असून जखमी व्यक्तींना रुग्णवाहिकेच्या मदतीने सोमाटणे फाटा, ता. मावळ येथील  पवना रुग्णालय, मायमर हॉस्पिटल, अथर्व हॉस्पिटल आणि युनिक हॉस्पिटल मध्ये उपचाराकरीता दाखल केले आहे. या घटनेत एकूण ४ व्यक्तींचा मृत्यू झाला असून पुढील कार्यवाही सुरु आहे.

इंद्रायणी नदीपात्रात कोसळलेला लोखंडी पूल क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. तसेच सदर घटनास्थळी मंत्री आपत्ती व्यवस्थापन, मंत्री- मदत व पुनर्वसन, विभागीय आयुक्त-पुणे विभाग, खासदार बारामती लोकसभा, आमदार मावळ विधानसभा, जिल्हाधिकारी पुणे उपविभागीय अधिकारी- मावळ, तहसिलदार मावळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक तळेगाव दाभाडे हे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!