Homeसामाजिकतळेगावातील मारुती मंदिर चौक ते गणपती मंदिर चौक डीपी रोडची रुंदी कमी...

तळेगावातील मारुती मंदिर चौक ते गणपती मंदिर चौक डीपी रोडची रुंदी कमी ठेवण्याची मागणी

तळेगाव दाभाडे : नगर परिषदेच्या हद्दीतील मारुती मंदिर चौक ते गणपती मंदिर चौक हा डीपी रस्ता १८ मीटर ऐवजी १२ मीटर करावा तसेच या रस्त्याचे काम पावसाळ्यानंतर करावे अशी आग्रही मागणी माजी उपनगराध्यक्ष किशोर छबुराव भेगडे व माजी नगरसेवक, माहिती अधिकार कार्यकर्ते अरुण बबनराव माने यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे.

नगरपरिषदेने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर डीपी रस्त्याच्या रुंदीकरणाचा घाट घातला आहे. नगरपरिषदेने हा रस्ता १८ मीटर रुंदी करण्यासाठी या रस्त्यालगत असलेल्या ६९ कुटुंबियांची घरे पाडावी लागतील अशी कुटुंबे बाधित होऊ नये म्हणून सध्याच्या रस्त्याची रुंदी वाढविण्या ऐवजी १२ मीटर रुंदी करून रस्ता करावा तसेच हे रुंदीकरण पावसाळा संपल्यानंतर करावे अशी मागणी हि करण्यात आली आहे.

मारुती मंदिर चौकातील तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मुख्य इमारतीपासून छत्रपती संभाजीनगर मार्गे साईनाथ कॉलनी ते डाळ आळी गणपती मंदिर पर्यंत १८ मीटर रस्ता रुंदीकरणाचे नियोजन करून नगरपरिषदेने या रस्त्यालगत असलेल्या ६९ कुटुंबीयांना नोटिसा दिल्या होत्या. या नोटीसा ६९ कुटुंबियांना मिळाल्यानंतर या रस्त्यावरील कुटुंबीयांची घबराट झाली होती.

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर या रस्त्याचे काम सुरू होणार असल्याने येथील सर्व नागरिक हवालदिल झाले होते. त्या सर्व ६९ कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे व माजी नगरसेवक अरुण माने यांची भेट घेऊन सदरील कारवाई थांबवावी अशी मागणी केली.

प्रतिनिधी:गणेश नामदेव भेगडे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!