निधन वार्ता=
तळेगाव दाभाडे : येथील अरुण केशवराव वैद्य(वय८४वर्ष) यांचे गुरुवार दिनांक १०जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले. एक विवाहित मुलगी.सुन. नातवंडे असा परिवार आहे. कै अरुण वैद्य हे निवृत्त महसुल अधिकारी होते.
आपल्या शासकीय सेवेच्या काळात त्यांनी अनेक गरजू व्यक्तींना निस्वार्थपणे मदत केली. तळेगाव दाभाडे येथील उद्योजक व विक्रांत तरुण मंडळाचे कार्यकर्ते अमोल वैद्य व अतुल वैद्य यांचे कै अरुण वैद्य हे वडील होते.



















